शिरूर : सविंदणेमध्ये बिबटयाचा गोट फार्मवर हल्ला, 10 बोकड ठार

शिक्रापुर : शिरुर तालुक्यातील सविंदणे येथे विनायक नरवडे या शेतकऱ्याच्या गोट फार्म वर बिबट्याने राञीच्या सुमारास हल्ला केला यामध्ये नर प्रजातीचे १० बोकड बिबटयाने केलेल्या हल्ल्यात ठार मारले तर ९ बोकड गंभीर जखमी केले आहे. बिबटयाने रात्रीच्या वेळी कपांऊडलगत असणाऱ्या झाडावरुन उडी मारत फार्ममध्ये प्रवेश केला. व तेथे असलेल्या बोकड या प्राण्यांवर हल्ला केला आहे.यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सानेन प्रजातीचे हे बोकड असून एका बोकडाची अंदाजे किंमत एक ते अडीच लाख रुपयांपर्यत आहे त्यामुळे अंदाजे सुमारे पंधरा लाखांचे आर्थिक नुकसान या शेतकऱ्यांचे झाले आहे.

वन परीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनरक्षक ऋषिकेश लाड वनकर्मचारी हनुमंत कारकुड, वनपाल चारूशिला काटे, पशुवैदयकिय आधिकारी डॉ. गोरख सातकर, डॉ . प्रकाश ऊचाळे यांनी घटनास्थळाला भेट दिली.यावेळी शेतकऱ्यांनी विभागाने तातडीने या गोष्टीची दखल घेऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी करत बिबटयाचे दिवसाढवळ्या दर्शन होत असल्याने वनविभागाने ताबडतोब पिंजरा लावण्याची मागणी देखील करण्यात आली.