Shirur Lok Sabha Election 2024 | शिरूरमध्ये भाजपला ‘दे धक्का’, अतुल देशमुख शरद पवार गटात प्रवेश करणार!

Shirur Lok Sabha Election 2024 | Atul Deshmukh will join the Sharad Pawar group in Shirur! 'Yeh To Trailer Hai, Picture Abhi Baqi Hai', Amol Kolhe's suggestive statement

‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’, अमोल कोल्हेंचे सूचक विधान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shirur Lok Sabha Election 2024 | राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपला (BJP) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नुकतेच भाजपला सोडचिठ्ठी देणारे खेड आळंदी विधानसभेचे (Khed-Alandi Vidhan Sabha) भाजपचे समन्वयक अतुल देशमुख (Atul Deshmukh) आज शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. तर अमोल कोल्हे यांनी ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’ असे सूचक वक्तव्य केले आहे.(Shirur Lok Sabha Election 2024)

अतुल देशमुख यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि भाजपच्या ध्येय धोरणांवर नाराजी व्यक्त करत दोन दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकला. अतुल देशमुख यांच्यावर भाजपने शिरुर लोकसभेच्या खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे समन्वयक म्हणून जबाबादारी सोपवली होती. मात्र त्यांनी आता राजीनामा दिला आहे.

(Atul Deshmukh) अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम केल्यानंतर ते आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला जाणार आहेत. शरद पवारांच्या भेटीनंतर ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दिलीप मोहिते पाटील आणि भाजपमधील अंतर्गत कुरघोडीमुळे आपण पक्षाचा राजीनामा देत असल्याचे देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होतं. त्यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन आपण भाजपमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे.

अतुल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपकडून त्यांची मनधरणी सुरुच आहे.
अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात हा भाजपसाठी मोठ्ठा धक्का मानला जात आहे.
अतुल देशमुख यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना ‘ये ट्रेलर है पिच्चर अभी भी बाकी है’ असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

ये ट्रेलर है पिच्चर अभी भी बाकी है

शरद पवार यांच्या कतृत्वाचं गारुड महाराष्ट्रावर येवढं मोठं आहे, हे फक्त तुम्हाला ट्रेलर बघायला मिळत आहेत.
मी अजूनही सांगतो पिक्चर अभी बाकी है. शरद पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र एकवटला आहे.
हे जे प्रवेश होत आहेत तो फक्त ट्रेलर आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
त्यामुळे आगामी काळात शिरुर मतदारसंघातील नाराज नेत्यांची एक मूठ बांधून भाजपला मोठा धक्का देण्याची तयारी विरोधकांनी केल्याचे बोलले जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Vijay Shivtare | ‘तुम्ही मला मूर्ख समजू नका’, विजय शिवतारेंबाबत अजित पवारांनी मांडली भूमिका (Video)

Total
0
Shares
Related Posts