Shirur Lok Sabha | शिरुर लोकसभा मतदारसंघातून लांडे की कोल्हे?, राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठा निर्णय!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shirur Lok Sabha | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. प्रत्येक पक्षाकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. या आढावा बैठकीत विद्यमान आणि इच्छूक उमेदवारांकडून मतदारसंघावर दावा केला जात आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha) विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांनी लोकसभेची तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Bhosari Former MLA Vilas Lande) यांनी शिरुर मतदार संघातून निवडणूक लढवण्याची (Lok Sabha Elections 2024) इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले होते. अखेर आज पुण्यात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीत शिरुर लोकसभा मतदारसंघाबाबत (Shirur Lok Sabha) राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला. आगामी लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील यावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची आढावा बैठक सोमवारी झाली.

शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला असून पुन्हा एकदा अमोल कोल्हेच लोकसभा निवडणुकीच्या
रिंगणात उतरतील. बैठकीत शरद पवार यांनी सर्वांसमोरच अमोल कोल्हे यांना तुम्ही पुन्हा लढणार का?
असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर अमोल कोल्हे यांनी देखील हो असे उत्तर दिले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सूचक विधान केलं होतं.
शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे हे चांगले उमेदवार आहेत, त्यांनी लोकसभेत उत्तम कामगिरी केली आहे.
त्यांनी बैलगाडा (Bullock Cart Race) संदर्भात संसदेत केलेली भाषण गाजली आहेत.
कोल्हे यांची संसदीय कार्यपद्धती उत्तम आहे.
त्यांना अनेक प्रश्नावर आवाज उठवल्याचं म्हणत जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे कोल्हेंनाच उमेदावीर मिळणार असल्याचे संकेत दिले होते.

Web Title : Shirur Lok Sabha | Vilas Lande or Amol Kolhe from Shirur Lok Sabha Constituency? Big decision in NCP meeting!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, टीका करताना शरद पवारांचा एकेरी उल्लेख (व्हिडिओ)

Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिसांकडून कात्रज चौकात रात्रीच्या वेळी परराज्यातील प्रवाशांना लुटणार्‍यांना अटक

Chandrakant Patil – Kothrud Pune | लोकसहभागातून आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार – चंद्रकांत पाटील