रांजणगाव औद्योगिक वसागतीतील कंपनीच्या अधिका-यांची बैठक

शिरूर :  प्रतीनीधी –   कंपन्यांमधील कामगारांची कमतरता प्रशासनाच्या मदतीने दुर करण्यासाठी उपविभागिय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या सुचनेनुसार रांजणगाव औद्योगिक वसागतीतील कंपनीच्या अधिका-यांची बैठक बोलवुन स्थानिक तरूणांना या कंपन्यांमध्ये काम मिळवुन देण्यासाठी प्रयत्न सुरू असुन तरी ही कामगारांची कमतरता भासल्यास इतर ठिकाणांहुन ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे तसेच लाॅकडाऊन पुर्वी व लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतर कंपन्यांच्या समस्या व काय परिस्थिती आहे याबाबत माहिती देण्याच्या सुचना देवुन त्या सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अॅड.अशोक पवार यांनी दिले.

औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या व कामगारांच्या समस्या जाणुन घेऊन त्या सोडवण्यासाठी तसेच स्थानिक तरूणांना कंपन्यांमध्ये काम मिळवुन देण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे शिरूर हवेलीचे आमदार अ‍ॅड.अशोक पवार यांनी बोलताना सांगितले.

यावेळी उपविभागिय अधिकारी संतोषकुमार देशमुख,तहसिलदार लैला शेख,नायब तहसिलदार श्रीशैल्य व्हट्टे,रांजणगावचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व नगरसेवक मुजफ्फर कुरेशी,युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे यांसह कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

कंपनी प्रशासनाने स्वतःसह कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असुन प्रशासनाकडुन दिल्या जाणा-या सुचनांचे व नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना यावेळी बोलताना आमदार अशोक पवार यांनी दिल्या.