आमदार पवार यांच्यावतीने नाभिक समाजाच्या 95 कुटुंबाना किराणा किटचे वाटप

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन सुरू असल्यामुळे हातावर पोट असलेल्या नाभिक समाजाचे सलुन व्यवसाय गेल्या दोन महिन्यांपासुन बंद असल्यामुळे शिरूर शहरातील नाभिक समाजाच्या ९५ कुटुंबाना तसेच शिरूर नगरपरिषदेतील २२५ सफाई कर्मचारी यांना शिरूर हवेलीचे आमदार अ‍ॅड.अशोक पवार यांच्यावतीने किराणा साहित्याच्या किटचे वाटप नगरपरिषदेच्या मंगल कार्यालयात करण्यात आले.

यावेळी नगरसेवक व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, अ‍ॅड.शिरीष लोळगे, बिजवंत शिंदे, माजी नगरसेवक संतोष भंडारी, युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे, उपाध्यक्ष चेतन येलभर, वकील सेलचे अध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र खांडरे, शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष शिंदे, पुणे जिल्हा विद्यार्थीचे सरचिटणीस राहिल शेख, कलीम सय्यद, हाफीज बागवान, सागर नरवडे, वैभव जोशी, शिरूर शहर नाभिक संघटनेचे शहराध्यक्ष निलेश भोसले यासह नाभिक समाजातील नागरीक आदी उपस्थित होते.

लाॅकडाऊन सुरू असल्यामुळे हातावर पोट असलेल्या नाभिक समाजाचे सलुन व्यवसाय गेल्या दोन महिन्यांपासुन बंद असल्याने त्यांना कुटुंबाच्या गरजा भागवताना अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.हि बाब लक्षात घेऊन शिरूर हवेलीचे आमदार अ‍ॅड.अशोक पवार यांनी नाभिक समाजातील गरजुंना किराणा किटची मदत करण्याच्या भुमिकेतुन गुरूवार दि.२८ रोजी शिरूर नगरपरिषदेच्या मंगल कार्यालयात ९५ गरजु नाभिक समाजाच्या कुटुंबाना किराणा साहित्याच्या किटचे वाटप केले.यावेळी आमदार अ‍ॅड.अशोक पवार यांचे नाभिक सामाजाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.

लाॅकडाऊन सुरू असल्याने गेल्या दोन महिन्यांपासुन हातावर पोट असलेल्या नाभिक समाजाचे सलुन व्यवसाय बंद असल्याने कुटुंबाच्या गरजा भागवताना त्यांना मोठ्या अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची दखल घेत शिरूर हवेलीचे आमदार अ‍ॅड.अशोक पवार यांच्यावतीने तालुक्यातील नाभिक बांधवांना किराणा किटचे वाटप करण्यात येत असुन शहरातील नाभिक समाजाला व नगरपरिषदेच्या २२५ सफाई कर्मचारी यांना किराणा साहित्याच्या किटचे वाटप गुरूवारी करण्यात आले.