शिरूर : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेची सुरूवात शिक्रापूरपासून

पोलिसनामा ऑनलाइन – ‘माझे कुटंब माझी जबाबदारी’ मोहिमेची सुरवात तालुक्यातील शिक्रापूरपासुन करण्यात येणार असुन दि.१५ व १६ या दोन दिवशी शिक्रापूरमध्ये जनता कर्फ्यू पाळुन घरोघरी जाऊन माहिती घेऊन तपासणी करण्यात येणार असुन नागरिकांना आरोग्य पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन शिरूरचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी केले आहे.

शासन निर्णय ११/०९/२०२० नुसार ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या माहिमेची शिरूर तालुक्यात शिक्रापूर या गावापासुन सुरवात करणेत येत आहे.यासाठी १५ पेक्षा जास्त अॅक्टिव्ह पेशंट असलेल्या शिक्रापूर (१८१),शिरूर न.प. (१५२), रांजणगाव गणपती (७५), शिरूर ग्रामिण (६५), कोरेगाव भिमा (६०),सणसवाडी (५९), तळेगाव ढमढेरे (२५),मांडवगण फराटा (२५), तर्डोबाचीवाडी (१६), धामारी(१६) या गावांची निवड करण्यात आली आहे .

शिक्रापूर गावात ही मोहिम दि.१५ व १६ सप्टेंबर रोजी रावविण्यात येणार असुन यासाठी एकूण ११० पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे .ही पथके घरोघरी जाऊन प्रत्येक नागरीकांची माहिती घेतील आणि संशयित व्यक्तीला तपासणीसाठी निश्चित केलेल्या ७ पैकी एका ठिकाणी जाणेसाठी सांगितले जाईल.या ठिकाणी रॅपिड अॅन्टिजेन तपासणीची व्यवस्था केली असुन त्याच वेळी या टेस्टचा अहवाल प्राप्त होईल आढळुन आलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांना तात्काळ कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करून उपचार करण्यात येणार आहेत.

तरी या मोहिमेअंतर्गत सर्व नागरीकांना आरोग्य पथकाला सहकार्य करावे. मोहिमेच्या कालावधीत दि .१५ व १६ सप्टेंबर रोजी पुर्ण शिक्रापूर या कालावधीत दि.१५ व १६ सप्टेंबर रोजी पुर्ण शिक्रापूरमध्ये जनता कर्फ्यू पाळण्यात येईल व दरम्यान सर्व प्रकारच्या व्यापारी आस्थापना,दुकाने,बँका,उदयोग बंद राहतील फक्त जिवनावश्यक वस्तुंची व वैदयकिय दुकाने व सुविधा सुरू राहतील.अशी माहिती शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी दिली.