Shirur News | अतिक्रमणाचा ताबा देणेसाठी चक्क नायब तहसिलदारांने बनवली बनावट कागदपत्रे? शिरूर तहसिल कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  (सचिन धुमाळ) –  कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जमीन मोजणीसाठी असणाऱ्या नियमाचा आधार घेऊन खोटे ,बनावट कागदपत्र तयार करून आपल्या अधिकाराचा गैरवापर करत अतिक्रमण दाखवून जमिनीचा ताबा दिल्याचा अतिशय गंभीर व धक्कादायक प्रकार शिरूर (Shirur) तहसीलदार यांच्या कार्यालयात घडल्याचे समोर आले.
महसूल विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
शिरूर (Shirur) येथील नायब तहसिलदार पदावर काम करीत असलेले ज्ञानदेव यादव यांनी हा प्रकार केल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी पुणे.
विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मांडवगण फराटा येथील वाल्मिक महादेव फराटे, गंगुबाई महादेव फराटे यांच्या मालकीच्या गट नं . २५६/१, २५६/२ या क्षेत्राची हद्द कायम करण्यासाठी अतिअतितातडीच्या सरकारी मोजणीमध्ये मोजणी करून निघालेल्या अतिक्रमणाचा ताबा देण्यासाठी बोगस कागदपत्रांमध्ये पोलीस बंदोबस्त मिळणेसाठी द्यावयाचे पत्र.
मंडल अधिकारी यांना ताबा देण्यासाठी उपस्थित राहण्याबाबतचा आदेश आणि ज्या शेतकऱ्यांकडे अतिक्रमण निघाले आहे.

त्या शेतकऱ्यांना द्यावयाचे नोटिसा इत्यादी सर्व काही बोगस आणि बनावट तयार करून संगनमताने अतिक्रमणाचा ताबा दिल्याच्या तक्रारी उपविभागीय अधिकारी पुणे .
यांच्याकडे मांडवगण फराटा येथील तक्रारदार शेतकरी, सचिन गोरख जाधव, अलका बबन शेलार, गोपीचंद सदाशिव फराटे या शेतकऱ्यांनी केल्या.
असून यामधील मुख्य सुत्रधार नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव हे असून या अधिकाऱ्याला विभागीय अधिकारी पुणे यांनी कारणे दाखवा नोटिस बजावून यादव यांचेकडून खुलासा मागून घेतला आहे.
या प्रकारामध्ये मांडवगण फराटा येथील वरील गट नं.ची हद्दनिश्चित मोजणी असताना खोटा, बनावट इ बोगस आदेश वापरून अधिकाराचा गैरवापर करून अतिक्रमण निश्चित झालेले नसताना सुद्धा ताबा देणेसाठी दिवाणी न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना प्रत्यक्ष ताबा देण्याचा प्रकारामध्ये बेकायदेशीर अधिकाराचा वापर झाल्याची बाब उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर निदर्शनास आली असून यावर आता यादव यांच्यावर काय कारवाई होते?.
याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

याबाबत नायब तहसीलदार यादव यांच्याशी संपर्क साधला .
त्यांनी मीटिंगमध्ये आहे असे सांगत बोलण्यास टाळले.
मांडवगण फराटा येथील अतिक्रमणाचा ताबा मिळवण्याबाबत नायब तहसिलदार ज्ञानदेव यादव यांनी त्यांना कुठलाही अधिकार नसताना तहसिलदार म्हणून माझ्या बनावट सह्या करून पोलिस बंदोबस्तासाठी मला न विचारता सदर आदेश काढले असून त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे.
माझ्या सहीचा गैरवापर हे ज्ञानदेव यादव यांनी केलेले अत्यंत चुकीचे काम आहे.
यादव यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई होण्याबाबतचा प्रस्ताव येत्या दोन दिवसांत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणार आहे.

श्रीमती.एल.डी शेख (तहसिलदार, शिरूर)

Pune Crime News | मोक्का कारवाई नंतर गायब झालेला सराईत गुन्हेगार सुलतान उर्फ टिप्या पोलिसांच्या जाळयात, उस्मानाबाद जिल्हयातून अटक

Web Title : Shirur News | Fake documents made by Deputy Tehsildar to control encroachment? Shocking type in Shirur tehsil office