Shirur News | म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन साठी 60 हजारांची फसवणूक; शिरुर तालुक्यातील पाबळ येथील घटना

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन  (policenama online) – शिरूर (shirur news) तालुक्याच्या पाबळ (pabal) येथील एका इसमाला म्युकर मायकोसिस (mucormycosis) या आजारावर लागणाऱ्या इंजेक्शन ची आवश्यकता असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून एका इसमाने एमंफोटेरीसिन बी इंजेक्शन (Amphotericin B injection) देण्याच्या बहाण्याने तब्बल साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.
असल्याने याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन (shikrapur police satation) येथे पांचाळ नामक इसमावर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Shirur News | Fraud of 60 thousand for injection of mucor mycosis; Incident at Pabal in Shirur taluka

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याबाबत अधिक माहिती अशी की पाबळ ता. शिरुर येथील एका इसमाला म्युकर मायकोसिस या आजाराची बाधा झालेली असताना सदर आजारावरील एमंफोटेरीसिन बी इंजेक्शन कोठे उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी एमंफोटेरीसिन बी या इंजेक्शन चा शोध घेण्यासाठी सांगितले होते.
त्यामुळे सदर इसमाच्या नातेवाईकांनी सदर इंजेक्शन बाबत सोशल मीडियावर माहिती घेतली.
असता नगर येथील एका ठिकाणी पांचाळ नामक इसमाकडे एमंफोटेरीसिन बी हे इंजेक्शन (Amphotericin B injection) उपलब्ध असल्याचे त्यांना समजले.
त्यामुळे त्यांनी सदर इसमाच्या मोबाईल वर संपर्क करुन चर्चा केली.
यावेळी चार हजार रुपये प्रमाणे तीस एमंफोटेरीसिन बी इंजेक्शन लागणार असल्याने त्यांना पन्नास टक्के रक्कम घ्यायची ठरले.
त्यामुळे आजारी रुग्णाच्या नातेवाईकांनी सदर इसमाला त्याने दिलेल्या बँक खात्यावर साठ हजार रुपये पाठवले त्यांनतर दोन दिवस पांचाळ नामक इसमाने इंजेक्शन दिले नाही.
तसेच फोन देखील उचलला नाही.

त्यामुळे आपली फसवणूक झाली.
असल्याचे सदर म्युकर मायकोसिस बाधित रुग्णाच्या नातेवाईकांच्या लक्षात आले.
त्यामुळे सदर रुग्णाच्या नातेवाईकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
असल्याने शिक्रापूर पोलिसांनी पांचाळ ( पुर्ण नाव पत्ता माहीत नाही ) या इसमावर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंके व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहे.

Web Title : Shirur News | Fraud of 60 thousand for injection of mucor mycosis; Incident at Pabal in Shirur taluka

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला गुन्हे शाखेकडून अटक; आज दुपारी कोर्टात हजर करणार