शिरूर : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ! नागरिकांनी सहकार्य करण्याचे मुख्याधिकारी रोकडे यांचे आवाहन

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रूग्ण वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन शहरात दि.१६ व १७ या दोन दिवशी शहरात जनता कर्फ्यू पाळुन ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य पथकाच्यावतीने माहिती घेऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार असुन, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

दिवसेंदिवस शहरात कोरोना बाधीत रूग्णांमध्ये होत असलेली वाढ व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिरूर नगरपरिषदेच्यावतीने दि.१६ व १७ या दोन दिवशी दि. १६ व १७ या दोन दिवशी शहरात जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असुन अत्यावश्यक सेवा वगळुन सर्व व्यवसाय बंद ठेवुन ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत संपुर्ण शहरातील १० वार्डमध्ये ३०० कर्मचारी अधिकारी यांच्या आरोग्य पथकाच्यावतीने तापमान, ऑक्सिजन तपासणी करण्यात येणार आहे.

आरोग्य पथकाच्यावतीने घरोघरी जाऊन माहित घेतली जाणार असुन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.या सर्वेक्षणात बाधीत रूग्ण आढळुन आल्यास त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार असुन शहरात मुबई बाजार शाळा, लाटे आळी शाळा, ग्रामीण रुग्णालय, आरएमडी स्कूल, नवीन नगरपरिषद इमारत या ठिकाणी तात्पुरती तपासणी केंद्र व फ्लू हॉस्पिटल तयार करण्यात येणार आहेत. संशयित रूग्णांसाठी दोन रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या असुन नागरिकांनी कुटुंबात कोणी आजारी असल्यास माहिती न लपवता योग्य माहिती देऊन आरोग्य पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.