झालेल्या प्रकाराबाबत तहसीलदारांना माहितच नाही, संबधिताना कारणे दाखवा नोटिसा : तहसीलदार

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाईन (सचिन धुमाळ) –  शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरामध्ये महसूल विभागाचे नायब तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने वाळूच्या गाड्यांवर कारवाई करत. गाड्या ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना एका वाहन चालकाने महसुलच्या पथकाच्या हातावर तुरी देत गाडी पळून नेल्याची घटना समोर आली होती. यानंतर नायब तहसीलदार श्रीशैले वट्टे यांच्या कडून काही तासानंतर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली .मात्र या तक्रारीबाबत आणि कारवाईबाबत तहसीलदार लैला शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कार्यालय प्रमुखाचे कोणतेही पत्र नसताना सदर कारवाई करण्यात आली आहे.

तसेच गुन्हा दाखल करताना देखील कोणत्याही प्रकारे कार्यालयीन पञ मी दिलेले नाही.याबाबत मला कुठल्याही प्रकारची कल्पना देखील देण्यात आलेली नाही.माझ्या कुठल्याही आदेशाविना ही कारवाई करण्यात आलेली आहे .या सर्व गोष्टीमुळे मला मोठा मनस्ताप होत आहे.याबाबतीत संबाधितांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात येणार आहे.

यासर्व प्रकारामुळे महसूल विभागात चाललंय तरी काय ? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.तर
महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही का ? हा देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या बाबतीत नायब तहसीलदार श्रीशैल वट्टे यांच्याशी संपर्क साधला असता होउ शकला नाही.