शिरूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उप सभापतींचा राजीनामा

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाचा शशिकांत दसगुडे व उपसभापतीपदाचा विश्वास ढमढेरे यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रविंद्र काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व नगरसेवक मुजफ्फर कुरेशी,युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे उपस्थित होते.

सन २०१७ ला बाजार समितीची निवडणुक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या कामगीरीवर विश्वास ठेवुन राष्ट्रवादी पॅनेलचे दोन तृतीयांश बहुमताने उमेदवार निवडुन दिले होते.१५ जून २०१७ रोजी सभापतीपदी दसगुडे व उपसभापतीपदी ढमढेरे यांची बिनविरोध निवड पार पडली होती.सभापती दसगुडे व उपसभापती ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने अतिशय चांगले काम करून तोट्यात असलेली शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती तीन वर्षातच नफ्यात आणली असल्याचे तालुकाध्यक्ष काळे यांनी सांगितले.

दरम्यान इतर संचालकांना सभापती व उपसभापतीपदारव काम करण्याची संधी मिळावी या हेतुन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी मला राजीनामे घेण्यास सांगितले असता दसगुडे व ढमढेरे यांनी तत्काळ निवडी वेळी ठरल्या प्रमाणे स्वेच्छेने राजीनामे दिलेले असल्याचे तालुकाध्यक्ष रविंद्र काळे यांनी सांगितले