शिरूर : विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर येथील सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर निमगाव म्हाळुंगी येथे पार पडले.

सध्या प्रत्येक कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांना वेध लागलेत ते एनएसएस युनिटचा आत्मा असलेल्या ‘कॅम्प’चे. असाच एक कॅम्प नुकताच शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी या गावांमध्ये पार पडला. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी व सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. दिनांक ६ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान पार पडलेल्या या कॅम्पमध्ये सुमारे ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

बी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. जी. बाहेती, डी. फार्मसी चे प्राचार्य डॉ. अमोल शहा, संस्थेचे समन्वयक श्री शिवाजीराव पडवळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन कोठावदे, निमगाव म्हाळुंगी चे सरपंच सौ. ज्योती शिर्के, पोलीस पाटील श्री. किरण काळे व इतर ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. या कॅम्पमध्ये कॉलेजने विशेष असे उपक्रम राबवले. त्यात मंगळवार दिनांक ०७ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले, तसेच बुधवार दिनांक ०८ रोजी मोफत एचआयव्ही तपासणी शिबिराचे आयोजन केले, तसेच गुरुवार दिनांक ०९ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले.

या सर्व शिबिरांना गावकऱ्यांकडून खूप उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. तसेच या कॅम्पमध्ये एनएसएस विद्यार्थ्यांनी पहिल्या तीन दिवसांत गावातील स्मशानभूमी, दशक्रिया घाट येथे स्वच्छता करून गावकऱ्यांची महत्त्वाची अडचण दूर केली. त्याचप्रमाणे कॅम्पच्या चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांनी गावामध्ये हेल्थ सर्व्हे करुन स्थानिकांची माहिती घेतली. कॅम्पच्या पाचव्या दिवशी विद्यार्थ्यांनी गावातील ग्रामदैवत म्हसोबा मंदिराची स्वच्छता केली. सहाव्या दिवशी विद्यार्थ्यांनी गावातील पेठेत स्वच्छता केली.

प्रोग्राम अधिकारी प्रा. सचिन कोठावदे व त्यांचे सहकारी तानाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सर्व कामे पार पाडली. शिबिराचा समारोप दिनांक १२रोजी पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सरपंच ऍड. करपे, तसेच सरपंच सौ. ज्योती शिर्के, पोलीस पाटील श्री. काळे उपसरपंच विधाटे, किशोर राऊत, विकास रणसिंग, महेश गोसावी, ऍड. गणेश शिर्के, बी. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी जी बाहेती, डी. फार्मसी चे प्राचार्य डॉ अमोल शहा, संस्थेचे समन्वयक श्री. शिवाजीराव पडवळ, डॉ. मनोज तारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. निशिकांत शिंदे, सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन कोठावदे उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा –