Shirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अटकेत, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त

शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – शासनाने बंदी घातलेल्या गुटखा (gutkha) आणि तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यावर शिरुर पोलिसांनी (Shirur Police) कारवाई केली आहे. शिरुर पोलिसांनी (Shirur Police) केलेल्या या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून 14 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शिरुर पोलीस ठाण्याच्या (Shirur Police Station) करडे दूरक्षेत्र हद्दीतील करडे-कारेगाव रोडवर शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास करण्यात आली.

मोहनसिंग रघुविरसिंग सेंगर (वय-28 रा. कुरसेडा ता माधवगड, जि. जालौन उत्तर प्रदेश सध्या रा. सणसवाडी ता. शिरुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर एक अनोळखी व्यक्ती पळून गेला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल करणसिंग निहालसिंग जारवाल (Police Constable Karan Singh Jarwal) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

करडे-कारेगाव रोडवर पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना एक पिकअप (एमएच14 एचयु 9493) संशयित रित्या येताना दिसला.
पोलिसांनी गाडी थांबण्याचा इशारा केला परंतु वाहन चालकाने गाडी न थांबता वेगाने निघून गेला. पोलिसांनी पिकअपचा पाठलाग करुन आडवला.
गाडीमधील सामानाची झडती घेतली असता गाडीमध्ये 7 लाख 20 हजार रुपये किमतीचे महक पान
मसालाची 20 पोती आणि 1 लाख 80 हजार रुपये किमतीची तंबाखू आढळून आली.
पोलिसांनी पान मसाला, तंबाखू आणि पिकअपसह 14 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला 4 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे (Police Inspector Pravin Khanapure) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे,
पोलीस हवालदार मुकुंद कुडेकर, पोलीस कॉन्स्टेबल करणसिंग जारवाल, प्रविण पिठले यांच्या पथकाने केली.

Web Tital : Shirur Police | 14 lakh gutkha smugglers arrested in Shirur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Triple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ ! मोहिते-साठे गटात तुफान ‘राडा’

PM Modi | पीएम मोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या काय आहे ई-रुपी, कसे करते काम आणि काय होईल फायदा

Lok Adalat | राष्ट्रीय लोक आदालतमध्ये वाहतूक शाखेच्या 10 हजार केसेस निकाली, 1.22 कोटींचा दंड जमा