खाऊच्या आमिषानं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधमास शिरूर पोलिसांकडून अटक

शिक्रापुर  : प्रतिनिधी –   शिरुर तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून अल्पवयीन मुलीस खाउचे आमिष दाखवुन अत्याचार करणा-या नराधमास शिरुर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती शिरुरचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी दिली.तर चंद्रशेखर दिलीप वनशिव(वय.३२,रा.वडगाव रासाई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत शिरुर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार,(दि.२९) रोजी आरोपी याने अल्पवयीन मुलीस खाउचे आमिष दाखवुन आरोपी याने दुचाकीवर बसवुन वडगाव रासाई,पारगाव कोळगाव डोळस,येथे घेवुन जाउन कोळस डोळस येथे पिडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला.याबाबत शिरुर पोलिस स्टेशनला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल होताच शिरुर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित आरोपी याला पकडण्यासाठी पथक रवाना केले.पोलिसांच्या पथकाने शोध घेत आरोपीस ताब्यात घेउन (दि.३१) रोजी अटक केली आहे.हि कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक बिरदेव काबुगडे,सुभाष रुपनवर,करणसिंग जारवाल,योगेश गुंड या पथकाने केली.या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रविन खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बिरदेव काबुगडे हे करत आहेत.