‘कळस’ चोरी प्रकरणाचा 2 तासात छडा, शिरुर पोलिसांची कामगिरी

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ) –   शिरुर तालुक्यातील शिरुर शहरानजीक डोंगरावर असलेल्या रेणुकामाता मंदिराचा कळस चोरी गेल्याची घटना घडली असून शिरुर पोलिसांच्या पथकाने अवघ्या दोन तासांत कळस चोरीचा प्रकरणाचा छडा लावत आरोपीस अटक केली आहे.

तर प्रशांत आबा म्हस्के (रा.बाबुरावनगर,शिरुर)असे कळस चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरुर शहरानजीक डोंगरावर असलेल्या रेणुकामाता मंदिराचा कळस गुरुवार (दि.६) रोजी राञीच्या सुमारास चोरी गेल्याचा प्रकार घडला होता. या बाबत शिरुर पोलिसांना माहिती मिळाताच घटनेचे गांभिर्य लक्षात घेत शिरुर पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांनी वेगाने सुञे हलवत घटनास्थळी धाव घेतली.यावेळी स्थानिकांनी सदर आरोपीस हटकले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी प्रशांत याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.यावेळी आरोपीकडे अंदाजे ४ ते ५ किलो वजनाचा पंचधातुचा सुमारे २० हजार रुपये किंमतीचा चोरी केलेला कळस मिळुन आला. शिरुर पोलिस स्टेशनला चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सदर कामगिरी पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलिस स्टेशनच्या तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे,पोलिस नाईक संजु जाधव,राजेंद्र गोपाळे,संतोष साळुंके,गोरक्षनाथ शिंदे,संतोष साठे,राहुल भागवत यांच्या पथकाने केली.