शिरुर पोलिसांची अवैध वाळु तस्करीवर कारवाई, तब्बल 30 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर पोलिसांच्या पथकाने तालुक्यातील आमदाबाद फाटा (ता.शिरूर) येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई करून तब्बल ३० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची पोलिस निरीक्षक प्रविन खानापुरे यांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुकडी नदीपात्रातून जेसीबी व ट्रॅक्टर च्या साहाय्याने वाळू उत्खनन करून हायवा ट्रक यांच्या माध्यमातून वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सोमवारी (दि.२२) रोजी आमदाबाद फाटा येथे छापा टाकून अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त केली. या प्रकरणी बाळू विलास सांगळे (रा. येळपणे, ता. श्रीगोंदा), ऋषिकेश ज्ञानदेव कर्डिले (राहणार. तर्डोबाची वाडी, शिरूर), उमाकांत सुर्यवंशी (रा. सरदवाडी, शिरूर), सौरभ बापूराव शितोळे (रा. पडवी, ता. दौंड), बिभीषण बापूराव गवारे (रा. बाबुराव नगर, शिरूर) व त्यांच्या इतर साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी या कारवाईत १ हायवा ट्रक, दोन एलपी ट्रक, १२ ब्रास वाळू असा मिळून ३० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बिरदेव काबुगडे, संतोष साठे, पोलिस मित्र यांनी केली.