शिरूर पोलिसांची अवैध धंद्यावर मोठी कारवाई ! चार लाख 88 हजार 534 रुपयांचा मुद्देमाल जप्त

शिक्रापुर – शिरूर पोलिसांनी टाकळी हाजी परिसरात अवैध दारू धंद्यांवर कारवाई करत सुमारे 5लाख 88हजार 534 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत टाकळी हाजी परिसरात अवैध दारू धंदे सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार शिरूर पोलिस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदार यांनी एकत्रित टाकळी हाजी, कवठे येमाई, मुंजाळवाडी, फाकटे या ठिकाणी छापा टाकून गावठी हातभट्टी तयार करणारे 43 प्लॅस्टिक बॅरल, कच्चे रसायन, दोन लोखंडी बॅरल, इतर साहित्य त्याचप्रमाणे 115 देशी विदेशी दारूच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी शिरूर पोलिसांनी पाच आरोपींवर गुन्हे दखल केले असून पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.