शिरूर पोलिसांचा वाळू माफियांना दणका, 4 ट्रक ताब्यात

शिक्रापुर : शिरूर तालुक्याच्या तर्डोबा वाडी येथील घोडनदी पात्रातुन अवैध रित्या वाळुचे उत्खनन करुन वाहतुक करण्याऱ्या चार ट्रकवर शिरूर पोलिस ठाण्याच्या रात्र गस्त पथकाने कारवाई करत सुमारे ४५ लाख साठ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे .अशी माहिती शिरुरचे पोलिस निरीक्षक प्रविन खानापुरे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांना तर्डोबा वाडी ता. शिरूर येथील घोडनदी पात्रातुन अवैध रित्या वाळुचे उत्खनन करून वाहतुक केली जात असल्याची गुप्त बातमी दारामार्फत माहिती समजली त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे, पोलिस निरीक्षक बिरदेव काबुगडे, उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सुनिल मोटे, पोलिस नाईक संजु जाधव, अनिल आगलावे, करणसिंग जारवाल , प्रविण पिठले, तुकाराम गोरे यांच्या पथकाने रात्री गस्ती दरम्यान तर्डोबावाडी येथे चार ठिकाणाहुन अवैध रित्या वाळु उत्खनन करुन जेसीबी च्या साह्याने हायवा ट्रकमध्ये तीन ब्रास वाळु भरून वाहतुक करणाऱ्या चार ट्रक करडे, न्हावरा व तर्डोबावाडी येथे पकडून ट्रक सह ४५ लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे . या प्रकरणी पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रविन खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.