वृध्द महिलेस पोलिस असल्याची बतावणी करून लुटणारा गजाआड, शिरूर पोलिसांकडून अडीच लाखांचा ऐवज परत

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – वृदध महीलेस पोलीस असल्याची बतावणी करुन लूटणारा सराईत गुन्हेगाराच्या शिरुर पोलीस स्टेशनच्या गून्हे प्रकटीकरण पथकाने मुसक्या अवळुन २ लाख ५० हजार रूपयांच्या सोन्याच्या बांगड्या वृध्द महिलेला परत केल्या असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी दिली.

याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,दिनांक ०७/०६/२०२० रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सूमारास फिर्यादी लीला दिपक बड़वे वय – ६१ वर्षे रा. शिरुर या सकाळी त्याचे कामानिमीत्त चालत बि. जे. कॉर्नर शिरुर येथून जात असाताना यातील आरोपीनी त्याना शिंदे बाईचे आंगावर चोरट्यांनी चाकूने मारुन त्याचे अंगावरचे सोने काढून नेले आहे मी पोलीस आहे.अशी बतावणी करुन फिर्यादी यांचे हातातील पाच तोळे सोन्याच्या २,५०,०००/- रुपये किमतीच्या ४ बांगडया हातातून काढायला लावल्या व हातचलाखी करुन त्यांना हिसका देवून घेवून आरोपी मोटारसायकलने पसार झाले.

सदर गून्ह्याचा तात्काळ तपास करण्याच्या सूचना पोलीस अधिक्षक संदीप पाटील,अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते व उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड ऐश्वर्या शर्मा यांनी पोलीस निरीक्षक प्रविण खानापूरे यांना दिल्या असता त्यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे व त्याचे सोबत पोलीस नाईक संजू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल मांडगे, पोलीस कॉन्स्टेबल साळवे, पोलीस कॉन्स्टेबल जंगम, पोलीस कॉन्स्टेबल जारवाल यांना वरीष्ठांनी दिलेले आदेश व सूचना सांगूण लवकारात लवकर गून्हा उघडकीस आणणे बाबत सांगीतले. गून्हेप्रकटीकरण पथकाने तपासाची तात्काळ चक्रे फिरवून गोपनिय बातमीदारामार्फत माहीती काढून सदर गुन्ह्यामधील आरोपी मूस्लीम यासीन इराणी रा. श्रीरामपूर जि. अहमदनगर यास अटक करुन लुटून नेलेल्या सोन्याच्या बांगडया व गून्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले. सोन्याच्या बांगड्या फिर्यादी वयोवृध्द लीला दिपक बडवे यांना देण्यात आल्या असल्याचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी सांगितले.

शिरूर पोलीसांनी गुन्ह्याचा योग्य व तत्पर तपास करून चोरीस गेलेल्या सोन्याच्या बांगड्या परत मिळाल्याने वयोवृदध फर्यादी लीला बडवे यांनी पोलीसांच्या कामाचे काैतुक करून आभार मानले. शिरुर पोलीसांनी नागरीकांना अशा प्रकारे अनोळखी व्यक्तींनी काही बतावणी केल्यास त्याचे बतावणीस बळी न पडता तात्काळ पोलीसांना माहीती देण्याबाबत आवाहन पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी केले आहे.