मिरवणूक काढल्याप्रकरणी चौघांवर शिरुर पोलिसांत FIR

शिक्रापुर :  प्रतिनिधी (सचिन धुमाळ) –    शिरुर शहरामध्ये बेकायदेशीर रित्या जमाव जमवुन कोवीड १९ या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने उपाययोजना न करता तसेच मास्क न लावता व त्याच कृत्याने कोवीड १९ चा प्रसार होईल हे माहीत असताना देखील मिरवणुक काढुन घोषणाबाजी करत, फटाके वाजवल्याप्रकरणी तसेच प्रशासनाने आणि पोलीसांनी दिलेल्या आदेशाचे अवमान केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी चार जण सह एक ट्रॕक्टर चालक आणि इतर १० ते १५ कार्यकर्त्यांविरूद्ध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिस शिपाई राजेंद्र पोपट गोपाळे यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी अमोल अंकुश खिल्लारे (वय २४),पुष्कर पोपट कर्नावट (वय २५),गणेश दिलीप गायकवाड (वय ३२),योगेश मुरलीधर महाजन (वय ३८)तसेच ट्रॅक्टर नं MH १६ F ६७२२ वरील चालक( नाव पत्ता माहीती नाही) याचासह १० ते १५ कार्यकर्ते वर भारतीय दंड विधान कलम-१४३,१८८,१८६,२६९, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५,आपत्ती व्यवस्थापन ५१(ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पुढील तपास शिरुरचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस नाईक मोरे करत आहेत.