Shirur Pune Rural Police News | शिरुरच्या दुचाकी चोरीच्या घटनेचा तपास करत पोलीस पोहचले वाशिमला; सराईत वाहन चोरट्याला पकडून 11 मोटारसायकली हस्तगत (Video)

Shirur Pune Rural Police News | Investigating Shirur's two-wheeler theft incident, police reached Washim; Sarait caught the vehicle thief and seized 11 motorcycles (Video

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिरुर परिसरातील मोटारसायकल चोरीच्या घटनेचा तपास करताना पोलीस थेट पोलीस वाशिमला पोहचले. त्यांनी तेथून एका सराईत वाहन चोरट्याला पकडून त्यांच्याकडून तीन जिल्ह्यातील ११ मोटारसायकली हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.
संतोष ऊर्फ शरद गजानन इंगोले (रा. पांगरी कुटे, ता. मालेगाव, जि. वाशिम) असे या चोरट्याचे नाव आहे. इंगोले हा सराईत वाहन चोरटा असून त्याच्याविरुद्ध जळुका पोलीस ठाणे (वाशिम), मालेगाव पोलीस ठाणे (वाशिम), पातुर पोलीस ठाणे (अकोला), जामनेर पोलीस ठाणे (जळगाव), लोणार पोलीस ठाणे आणि मेहकर पोलीस ठाणे (बुलढाणा) येथे दुचाकी चोरीचे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. (Arrest In Vehicle Theft)

याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले की, शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही काळात झालेल्या मोटारसायकल चोरी उघडकीस आणण्याच्या दृष्टीने शिरुर पोलीस ठाण्यातील वेगवेगळी पथके कार्यरत होती. पोलीस अंमलदार विजय शिंदे व नितेश थोरात यांनी मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे संतोष इंगोले याचा मोटारसायकल चोरीमध्ये हात असल्याची खात्री झाली. त्यानुसार पोलिसांनी वाशिममधील मालेगाव येथून संतोष इंगोले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील चौकशीत वाशिम येथून चोरीच्या ११ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या मोटार सायकलीमध्ये धाड पोलीस ठाणे (बुलढाणा), आळंदी पोलीस ठाणे – २ , चाकण, खडकी, महाळुंगे, दिघी, शिरुर, भोसरी एमआयडीसी येथील प्रत्येकी एक व इतर एक असे ११ गुन्हे उघडकीस आणून ६ लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. (Vehicle Theft Detection)

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, विशाल कोथळकर, पोलीस अंमलदार विजय शिंदे, निरज पिसाह, नितेश थोरात, अजय पाटील, सचिन भोई, निखील रावडे, रवींद्र आव्हाड यांनी केली आहे.

Total
0
Shares
Related Posts

Pune Crime News | पुणे : गाडी मागे घेण्याच्या कारणावरुन मिनाताई ठाकरे वसाहतीत दोन गटात ‘राडा’ ! कोयते, लाकडी बांबुने केलेल्या मारहाणीत दोन्ही गटातील चौघे गंभीर जखमी, खुनाचा प्रयत्न केल्याचा 14 जणांवर गुन्हा दाखल