शिरूर : वाळूच्या गाडया चोरी प्रकरणाला वेगळं वळण, नायब तहसिलदारांनी 4.5 लाख घेवून गाडया सोडल्याचा आरोप

शिक्रापुर : शिरूर तालुक्यात सध्या महसूल विभाग मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे,महसूल विभागाचे एकामागून एक कारनामे समोर येताना दिसत आहे .त्यातच आता पुन्हा एकदम महसूल विभागाच्या ताब्यातील अन्नधान्य गोडावून मधून तीन वाळूच्या गाड्या चोरीला गेल्या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचे पाहायला मिळतआहे. या प्रकरणात नायब तहसीलदार श्रीशैल वट्टे यांनी प्रत्येक गाडी सोडण्यासाठी दीड लाख दंड असे साडेचार लाख रुपये दंड घेऊन कोणतीही पावती न देता गोडावून पालक डाळींबकर यांना फोन करून गाड्या सोडण्यास सांगितला आणि त्या सोडल्या अशा धक्कादायक खुलासा गाड्या मालकांकडून करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी लेखी प्रतिज्ञापञ उपविभागीय अधिकारी शिरुर आणि तहसीलदार शिरुर यांना दिले आहे .तर या गाड्यांचा भरलेल्या साडेचार लाख रुपये दंडाच्या पावत्या बाबत वेळोवेळी मागणी करून देखील आज देऊ उद्या देऊ म्हणूत आज पर्यत कुठल्याही प्रकाची पावती दिली नाही . या उलट आमच्या विरोधात शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गाड्या चोरल्या बाबत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे संबंधित नायब तहसीलदार श्रीशैल वट्टे यांची योग्य ती चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी गाड्यामालक करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महसूल विभाग आता वेगवेगळ्याच कारणाने तालुक्यात चर्चेत आला आहे .

याविषयी बोलताना उपविभागीय अधिकारी (प्रांत) संतोष देशमुख यांनी सांगितले की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे चौकशी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला याविषयी प्रतिक्रिया दिली जाईल .तर तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले की प्रतिज्ञापत्र मला व्हाट्सअप वर मिळाले आहे त्या अनुषंगाने मी संबंधित नायब तहसीलदार आणि गोडाऊन पालक यांना खुलासा करण्यासाठी नोटीस बजावणार आहे.

याविषयी गाड्या मालकांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आमच्यावर अचानक पणे गुन्हे दाखल झाल्याने यामधून जामीन घेऊन बाहेर पडणास वेळ लागला.त्यामुळे तक्रारी साठी वेळ लागला. तर उपविभागीय अधिकारी( प्रांत) त्यांनी याबाबतीत लेखी मागितल्याने आम्ही नोटरी करून प्रतिज्ञापञ सादर केले आहे.

तर याबाबतीत “पोलिसनामा “ने नायब तहशिलदार श्रीशैल वट्टे यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधला असता संपर्क होउ शकला नाही. तर मिळालेल्या माहितीनुसार गोडावून पालक यांनी एका कागदावर गाड्या सोडताना गाड्या मालकासमोर गाडी कोणी सोडण्यास सांगितली हे देखील स्वतःच्या सुरक्षिततेसाठी लिहून ठेवले आसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे