सामाजिक उपक्रमांतर्गत वेदांंता हाॅस्पिटलच्यावतीने होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन – येथील वेदांंता हाॅस्पिटलच्यावतीने सामाजिक उपक्रमांतर्गत शिरूर शहरातील नाभिक बांधवांना अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी वेदांता हाॅस्पिटलचे डाॅ.आकाश सोमवंशी,डाॅ.हेमंत पालवे,डाॅ.धनंजय पोटे,शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष शिंदे,सचिव अर्जुन बढे,उपाध्यक्ष भाऊसाहेब खपके,शहराध्यक्ष किरण चीैधरी,सदस्य बबन वाघमारे,नाभिक संघटनेचे शहराध्यक्ष निलेश भोसले यांसह नाभिक समाजतील नागरीक उपस्थित होते.

या होमिओपॅथी गोळ्यांमुळे रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास उपयोग होत असल्याची बाब लक्षात घेऊन सामाजिक उपक्रमांर्गत वेदांता हाॅस्पिटलच्यावतीेने वाटप करण्यात येत असल्याने शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी वेदांता हाॅस्पिटलचे डाॅ.आकाश सोमवंशी यांना नाभिक बांधवांना सदर गोळ्या वाटप करण्याबाबत सुचविले असता त्यांनी तत्काळ होकार देत शहरातील नाभिक समाजाच्या कुटुंबाना सदर होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी आयुष मंत्रालय दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोरोना (कोविड १९)या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अर्सेनिक अल्बम ३० या होमीओपॅथी औषधाचा वापर केल्यास फायदा होत आहे असे नमूद केले असल्याचे वेदांता हाॅस्पिटलचे डाॅ.आकाश सोमनंशी व डाॅ.हेमंत पालवे यांनी सांगुन कोरोनाबाबत प्रशासनाच्या नियमांचे पालन करून घ्यावयाची काळजीविषयी जनजागृतीपर मार्गदर्शन करून माहिती सांगितली तसेच जवळे, राळेगण थेरपाळ, गुणोरे, गाडीलगाव,सांगवी सूर्या,जातेगांव,शिरूर तालुक्यातील सर्व कामगार तलाठी,शिरूर येथील सर्व नाभिक बांधव,त्रिमूर्ती व्हिजन सोसायटी शिरूर येथील रहिवाशी कुटुंबाना अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती सांगितली.