शिरुर शहरातील रस्त्यावर वृक्षारोपण ! भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांमध्ये झाडे लावून केला निषेध व्यक्त

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ) –   शिरूर शहरातील रस्ताची दुरवस्था इतकी भयानक झालीअसून खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी अवस्था झाली आहे.या रस्त्यांवरून दुचाकीवरून चालणे सोडा पण पायी चालणे सुद्धा कठीण होऊन बसलेले आहे.ऐन पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठून या खड्ड्याला ओढ्याचे स्वरुप प्राप्त होत होते.तर पावसाळ्यात रस्त्यांवरून वाहणारे पाणी त्यात प्रचंड खड्डे त्यामुळे नागरिकांना रस्त्याचा अंदाज येत नव्हता बऱ्याच ठिकाणी तर दुचाकीचे छोटे मोठे अपघात झाले .पावसाळ्यात अत्यंत भयानक परिस्थिती असलेल्या या रस्ताकडे नगरपालिका मात्र लक्ष देण्यास तयार नाही.अशा आरोप केला जात आहे.

याबाबत नगरपालिका प्रशासनाला वारंवार सूचना करून देखील कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने शिरूर शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने शिरूर शहरात विविध ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून नगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.यावेळी शिरूर शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष उमेश शेळके, सरचिटणीस ओंकार ससाणे, उपाध्यक्ष शिवम पाठकजी , सरचीटणीस करण खांडरे,उपाध्यक्ष कौस्तुभ उबाळे‌,सरचीटणीस सुयोग मंडले , समर्थ ससाणे , सुशांत खोले , वीलास वीर , प्रथमेश भुई , शुभम क्षीरसागर‌,चिटणीस, राहील रफिक शेख,विकी अमळनेरी,संकेत घावटे आणि शिरूर शहर युवामोर्चाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.