शिरूर : प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे पत्रकारांना मोफत वाटप

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमी प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्यांचे येथील डाॅ.भारती होमिओपॅथिक क्लिनिकच्या डाॅ.भारती शिंदे यांनी शहरातील पत्रकारांना मोफत वाटप केले.

सध्या कोरोनाचे रूग्ण वाढत असुन शासनाकडुन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.पत्रकार या परिस्थितही वार्ताकन करून विविध घडामोडी बातमीच्या माध्यमातुन समाजापर्यंत पोहचविण्याचे काम करत असतात या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने शिफारस केली असलेल्या अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांमुळे रोग प्रतिकार शक्ती वाढत असल्याने शिरूर शहरातील रेव्हेन्यू काॅलनी येथील डाॅ.भारती होमिओपॅथिक क्लिनिकच्या डाॅ.भारती शिंदे व डाॅ.किरण शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जपत या गोळ्यांचे मोफत वाटप पत्रकारांना केले.

चाैकट
आर्सेनिक अल्बम ३० ही होमिओपॅथिक गोळी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घेता येणार नाही. कोरोना नसलेल्यांनाच ही गोळी घेता येणार आहे. या औषधांचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याने या गोळ्या लहान मुलांपासून ते वृद्ध, गरोदर महिला, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजार असलेल्या व्यक्ती घेऊ शकतात.केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने याची सर्व राज्यांना शिफारस केली आहे.रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

डाॅ.भारती किरण शिंदे
डाॅ.भारती होमिओपॅथिक क्लिनिक,शिरूर