शिरुर तालुका शिवसेनेच्यावतीने तहसिल समोर आंदोलन

शिक्रापुर :  प्रतिनिधी (सचिन धुमाळ ) –   केंद्र शासनाने कांद्यावर निर्यातबंदी लावुन शेतक-यांना आर्थिक अडचणीत आणले आहे.कोरोना महामारीमुळे लॉकडाउनच्या काळात शेतक-याला शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे,त्यामुळे केंद्र शासनाने त्वरीत निर्यातबंदी उठवावी व कांद्याला योग्य बाजारभाव द्यावा अशी मागणी शिवसेनेचे शिरुर तालुकाप्रमुख सुधीर फराटे इनामदार यांनी केली.

शिरुर तालुका शिवसेनेच्यावतीने शुक्रवार(दि.१८) रोजी शिरुर तहसिलकार्यालय आवारात केंद्र शासनाच्या निर्यातबंदीच्या धोरणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.यावेळी शिरुर-आंबेगाव तालुकाप्रमुख गणेश जामदार,पं.स.सदस्य डॉ.सुभाष पोकळे,जिल्हासंघटक संजय देशमुख,शहरप्रमुख मयुर थोरात,युवासेनाअधिकारी बापु शिंदे,तालुका संघटिका चेतना ढमढेरे,शैलजा दुर्गे,विरेंद्र शेलार,शेतकरी सेनेचे योगेश ओव्हाळ,विजया टेमगिरे,संतोष भोंडवे,संजय पवार,नंदाताई भुजबळ उपतालुका संघटिका,समाधान डोके,आनंदराव हजारे,गणेश राउत आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी नायब तहसिलदार डि.के.यादव यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले.

शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीबाबत अचानक घेतलेला निर्णय शेतक-यांच्या जीवनावर वरवंटा फिरवणारा आहे.गेल्या सहा महिन्यांपासुन शेतकरी कोरोनामहामारीमुळे ञस्त आहेत.आपला पिकवलेला माल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे.आता कुठे शेतक-यांच्या कांद्याला योग्य भाव मिळत होता परंतु केंद्र सरकारने घेतलेला काळा निर्णय असुन हा शेतकरी विरोधी निर्णय त्वरीत मागे घ्यावा अशी मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.