खळबळजनक ! एका रात्रीत वाळूची झाली ‘क्रश सॅन्ड’, शिरूर तालुक्यातील अजब प्रकार

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाईन – शिरूर तालुक्यातील महसूल विभागाच्या ताब्यातील चार वाळूचा ट्रक चोरीला गेल्याचे प्रकरण ताजे असतानाच. पुन्हा एकदा शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये उभे असलेल्या वाळूचा ट्रक मध्ये रातोरात वाळूच्या जागेवर क्रश सॅण्ड (बारीक खडी) आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.त्यामुळे शिरुर तालुक्यात महसुल आणि पोलिसांचे चाललय तरी काय हा प्रश्न निर्माण झाला आहे….

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 22 जुलै रोजी पहाटे चार वाजता पुणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने MH 14 HG 7291 ही अवैध रित्या वाळू वाहतूक करणारी गाडी (हायवा) पकडून शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये उभी करुन पोलिसांच्या ताब्यात दिली होती. याबाबत महसूल विभागाला कल्पना दिल्यानंतर शिरुरच्या तहसीलदार लैला शेख यांच्या आदेशाने शिक्रापूर गाव कामगार तलाठी अविनाश जाधव यांनी या गाडीत वाळू असल्याबाबत पंचनामा केल्याची माहिती आहे. परंतु आता शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये उभ्या असलेल्या गाडीमध्ये या वाळूच्या जागेवर चक्क “क्रश सॅण्ड” (बारीक खडी)असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे रातोरात वाळूची “क्रश सॅण्ड”(खडी) कशी झाली हा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या वाळूच्या गाडीचा फक्त पंचनामा झालेला आहे. एकूणच काय तर शिरूर तालुक्यात महसूल विभागाच्या कारनाम्याचे एका मागून एक प्रकार समोर येताना दिसत आहे.त्यामुळे शिरुर तालुक्यातील महसुल आणि पोलिस प्रशासनाचे चाललय तरी काय अशा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे .

याबाबत शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की गाडी शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात असल्याने मी यावर काय बोलणार असे म्हणत यावर भाष्य करणे टाळले .तर उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा ,शिक्रापुरचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

तर “पोलिसनामा”शी बोलताना आमदार अशोक पवार यांनी सांगितले की झालेला प्रकार हा खूप गंभीर आहे.त्यामुळे शिक्रापुर पोलिस स्टेशनचे CCTV फुटेज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ ताब्यात घेउन चौकशी करावी.यामध्ये दोषी असलेल्या कर्मचारी ,अधिकारी यांच्यावर पोलिस अधिकक्षकांनी तात्काळ कारवाई करावी.