शिरूर तालुका शिवसेनेकडून कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध

शिक्रापुर, पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटक मधील मनगुंटी या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा जागेवरून काढल्याचा निषेधार्थ पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा आणि मांडवगण फराटा येथे कर्नाटक सरकारचा निषेध करत पुतळा परत बसविण्याची मागणी करण्यात आली.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला त्याच्या निषेधार्थ शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि मा.खासदार, शिवसेना उपनेते तथा संर्पकप्रमुख शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पुणे सल्लागार अनिल काशीद यांच्या उपस्थितीत कोरेगाव भीमा येथे शिवद्रोही कानडी सरकारचा पुतळा दहन करण्यात आला. तसेच मांडवगण फराटा येथे पुणे उपजिल्हाप्रमुख पोपटराव शेलार, शिरुर तालुका प्रमुख सुधीर फराटे व सर्व शिवसैनिक यांच्या उपस्थितीत पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले.