शिरूर : वीज कनेक्शन कट केल्याच्या रागातुन वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्याच्या शिक्रापुर ग्रामपंचायत जवळील मोती चौक येथे 1 महिन्यापूर्वी वीज कनेक्शन कट केले याचा राग मनात धरून वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांना शिवीगाळ दमदाटी व धमकी दिल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एका व्यक्तीवर सरकारी कामात अडथळा व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

याबाबत गणेश तुकाराम वगरे,( वय 33, व्यवसाय नोकरी, राहणार हल्ली सानवी रेसिडन्सी, शिक्रापुर, ता. शिरूर, जि. पुणे. मुळगाव मु. पो. पांढरेवाडी, ता. पंढरपुर, जि. सोलापुर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून मन्सुरभाई इनामदार (रा. शिक्रापूर ता शिरूर जि पुणे ) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजताचे सुमारास शिक्रापुर, ता. शिरूर, जि. पुणे गावचे हद्दीत शिक्रापुर ग्रामपंचायत ते मोती चैक परिसरात मी, व आमचे महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यांदीत, शाखा शिक्रापुर येथिल अधिनस्त सहकारी तंत्रज्ञ भरत पवार, बाहयस्त्रोत तंत्रज्ञ धनंजय गढवे व शिकाऊ तंत्रज्ञ रामेष्वर जाधव यांचेसह आमचे महवितरण कंपनीचे विज बिल थकबाकीदारांचे विज कनेक्शन तोडणेचे कामकाज करण्यासाठी पायी चालत जात असताना जामा मशिदी जवळ रहाणारा शाहरूख मन्सुरभाई इनामदार याने अडवुन त्याचे रहाते घराचे एक महीन्यापुर्वी थकीत विज बिलामुळे आमचे कार्यालयाकडुन विज कनेक्शन कट केल्याचा राग मनात धरून ‘‘ तुंम्ही माझे घराचे एक महीन्यापुर्वी लाईट कनेक्शन का तोडले, ’’ असे ओरडुन ‘‘ तुंम्ही आमचे नोकर आहात, तुंम्हाला माझे विज कनेक्शन कट करायचा अधिकार कोणी दिला, तु परत या एरियामध्ये कनेक्शन कट करण्यासाठी यायच नाय, असे म्हणत दमदाटी केली. मोती चौक परिसरातील पुढील शासकीय काम करण्यास प्रतिबंध केला आहे.

याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सरकारी कामात अडथळा व शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार होले करीत आहे.