शिरूरमध्ये वाळू तस्करांकडून तहसिलदारांच्या गाडीचा पाठलाग!

पुणे :  पोलीसनामा

अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्कारांची मजल आता शासकीय अधिकाऱ्याचा पाठलाग करण्यापर्यंत गेली आहे. असाच प्रकार शिरूर तालुक्यात घडला आहे. वाळू तस्कारांवर धडाकेबाज कारवाई कराणारे शिरुरचे तहसिलदार रणजित भोसले यांचा दिवसभर एका इनोव्हा गाडीने पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या इनोव्हा गाडीचालकाच्या विरोधात तहसिलदार भोसले यांनी शिक्रापूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही इनोव्हा गाडी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील अभय औटी यांची असल्याची प्राथमिक माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
[amazon_link asins=’B07G32YJTB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b1955c54-af9a-11e8-ab00-2f839670c0ff’]
तहसिलदार रणजित भोसले यांनी रविवारी उशिराया बाबात शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भोसले हे रविवारी आपले दैनंदिन काम उरकून शिरुर कार्यालयातून दुपारी तीनच्या सुमारास कोरेगाव-भिमा (ता. शिरूर)च्या दिशेने त्यांच्या खासगी वाहनाने निघाले होते. यावेळी एक पांढरी इनोव्हा गाडी (एमएच १६ बी वाय ००७७) भोसले यांच्या गाडीचा पाठलाग करु लागली. पुढे कोरेगाव-भिमा येथील काम उरकून ते शिरसगाव-काटा (ता. शिरूर) इथे जाण्यासाठी पुन्हा पुणे-नगर रोडने परत निघाले. या वेळीही ही गाडी त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होती. भोसले यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी सणसवाडी (ता. शिरूर) येथील एका पेट्रोल पंपावर त्यांची गाडी थांबवली. त्यावेळी पाठलाग करणारी गाडीही पेट्रोल पंपात त्यांच्या मागोमाग आली.

जाहिरात

यावेळी भोसले यांनी धाडस करुन पाठलाग करणाèया गाडीत कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला असता पाठलाग करणाऱ्या गाडीच्या चालकाने तेथून पळ काढला. गाडीत दोन जण होते, असे भोसले यांनी तक्रारीत म्हटले आहे. बेकायदा वाळू उपसा करता यावा म्हणूनच आपला पाठलाग केला जात असल्याचेही त्यांनी  तक्रारीत नमूद केलेले आहे
.
यासंदर्भात शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले की, कुणाही शासकीय कर्मचारी-अधिकारी यांचे बाबतीत असा प्रकार होणे गंभीर असून भोसले यांच्या तक्रारीवरुन पाठलाग करण्यात आलेल्या इनोव्हा गाडीच्या क्रमांकाची माहिती आरटीओकडून घेतली असता प्राथमिक तपासानुसार ही गाडी पारनेर (जि.नगर) येथील अभय औटी यांची असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार या गाडीत असलेला व्यक्ती आणि त्यांचा उद्देश याचा तपास करण्यासाठी त्यांना ताब्यात घेतले जाईल व धडक कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.

जाहिरात