शिरूर मध्ये आत्ता दररोज मिळणार पिण्याचे पाणी नगरसेवक : मुजफ्फर कुरेशी

शिरूर : प्रतिनिधी –  शिरूर नगरपरिषदेच्यावतीने शिरूर शहरात गुरूवारी देखील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा समितीचे सभापती मुजफ्फर कुरेशी यांनी पोलिसनामा शी बोलताना सांगितले.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमी कुठुंबातील व्यक्ती बाहेरून आल्यानंतर आंघोळ करावी लागत असल्याने तसेच वारंवार हात स्वच्छ धुण्यासाठी सध्या घरोघरी पाण्याचा वापर वाढला असल्याने शहरातील नागरीकांनी दर गुरूवारी मेंटन्स व टाक्या धुण्यासाठी बंद ठेवण्यात येणारा पिण्याचा पाण्याचा पुरवठा बंद न ठेवता आठवड्यातील आठही दिवस सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती.

याबाबत सभागृहनेते प्रकाश धारीवाल,विकास आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड.सुभाष पवार,नगराध्यक्षा वैशाली वाखारे व नगरसेवक विजय दुगड यांच्याशी नागरिकांकडुन दर गुरूवारी सुरळीत पाणी पुरवठ्याची होत असलेल्या मागणीबाबत चर्चा करून दर गुरूवारी शहराचा पाणी पुरवठा बंद न ठेवता तो गुरूवारीही सुरू ठेवण्याबाबत निर्णय झाला असुन नागरिकांकडुन होणारी मागणी लक्षात घेऊन ऑगस्ट पर्यंत शहरात दर गुरूवारी सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती शिरूर नगरपरिषदेचे पाणी पुरवठा समितीचे सभापती मुजफ्फर कुरेशी यांनी सांगितली.