शिवसेनेचे उपनेते आढळराव पाटील यांंनी शिरूरला घेतली आढावा बैठक

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महसुल,आरोग्य,पंचायत समिती व पोलीस विभागाच्या अधिका-यांबरोबर शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तहसिल कार्यालय येथे शनिवार दि.२ रोजी आढावा बैठकी दरम्यान शिरूर तालुक्यातील आरोग्यविषयक परिस्थितीचा आढावा घेऊन अवश्यक त्या सुचना केल्या.

महसुल, आरोग्य, पंचायत समिती, पोलीस, नगरपरिषद विभागास यावेळी वैद्यकीय सुरक्षा किटचे तसेच पत्रकारांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.यावेळी तहसिलदार लैला शेख, शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख माऊली कटके, उपजिल्हा प्रमुख, पोपट शेलार, सुनिल बानखिले, पंचायत समिती सदस्य डाॅ.सुभाष पोकळे, जिल्ह समन्वयक कैलास भोसले, तालुकाप्रमुख सुधीर फराटे, शहर प्रमुख मयुर थोरात, नगरसेवक संजय देशमुख, आंबेगाव पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखिले, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजेंद्र शिंदे, ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डाॅ.तुषार पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे आदि उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले,कोरोनाचे रूग्ण सापडत असलेल्या पुणे व मुंबई शहरातुन अवैद्य मार्गाने पुण्याच्या ग्रामीण भागात येणा-या नागरिकांची संख्या जास्त आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी ही चर्चा झालेली असुन अशा नागरिकांना होम क्वारंटाईन करून काहीच उपयोग होत नसुन ते विसरतात आणि बाजार व इतर कारणाने बाहेर जात असल्याचे दिसुन येत असल्याने अशा पध्दतीचे होम क्वारंटाईन प्रभावी ठरत नसल्याने अशा नागरिकांना शासकीय विलगीकरण कक्षात क्वारंटाईन करण्याच्या तसेच इतर सुचना अधिकारी यांना केल्या असुन मतदार संघात फिरून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक आढावा घेतला असुन शिवसोनेच्यावतीने प्रशासनाला अवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. आंबेगाव, खेडमध्ये अन्नछत्र उघडले आहे तसेच शिरूर शहरात अवश्यकता भासल्यास अन्न छत्राबरोबरच इतर मदत करण्यात येणार असल्याचे सांगुन पत्रकारांनी देखील वार्तांकनाचे आपले काम करताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी असा सल्लाही शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी पत्रकारांना दिला.