शिव जयंती 2020 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त SMS, Images, WhatsApp Message ने द्या शुभेच्छा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. पुण्यात १९ फेब्रुवारी १६३० रोजी जन्मलेल्या शिवाजी महाराजांनी अखंड भारत आणि स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि मराठा साम्राज्य उभे केले. शिवाजी महाराजांना शूर, बुद्धिमान, शौर्याने परिपूर्ण आणि इतिहासातील एक महान राजा म्हणून पुजले जाते. शिवाजी महाराजांच्या राजवटीत सर्वसामान्यांना न्याय मिळाला म्हणूनच आजही त्यांना जनतेचा राजा म्हटले जाते. महाराष्ट्रात अजूनही त्यांची पूजा केली जाते. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे आणि आई जिजाबाई होत्या. त्यांचा जन्म पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला.

सन १६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते ‘छत्रपती’ झाले. तसेच त्यांना हिंदु हृदय सम्राट देखील म्हणतात. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही अभिवादन संदेश…

सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे

काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!

तूफान गर्जतो, आग ओकतो,

वाघ मराठी माझा !

सन्मान राखतो, जान झोकतो

तुफानं मातीचा राजा !

———————-

सूर्य नारायण जर उगवले नसते तर..

आकाशाचा रंगचं समजला नसता..

जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..

खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..

हे हिंदु प्रभो शिवाजी राजा

बघतोस काय रागाने ?

कोतळा काढलाय वाघाने !

———————-

पाठीवर शिवाजी आन

छाताडावर संभाजी कोरलाय..

अन जीवाचं नाव भंडारा ठेवलाय,

उधळला तरी येळकोट आन

नाय उधळला तरी बी येळकोटच…!

——————–

ताज महल अगर प्रेम की निशानी है,

तो शिवनेरी किला एक शेर की कहानी है

छत्रपति शिवाजी महाराज की जयंती की शुभकामनाएं !

———————-

जो व्यक्ति स्वराज्य और परिवार के बीच स्वराज्य को चुनता है वही एक सच्चा नागरिक होता है।- छत्रपति शिवाजी महाराज

जब लक्ष्य जीत का हो, तो हासिल करने के लिए कितना भी परिश्रम, कोई भी मूल्य क्यों न हो उसे चुकाना ही पड़ता है।

———————-

शिवराय सांगायला सोपे आहेत,

शिवराय ऐकायला सोपे आहेत,

शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,

पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..

आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,

तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!

जय शिवराय! जय जिजाऊ!

———————-

छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,

त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,

प :- परत न फिरणारे,

ति :- तिन्ही जगात जाणणारे,

शि :- शिस्तप्रिय,

वा :- वाणिज तेज,

जी :- जीजाऊचे पुत्र,

म :- महाराष्ट्राची शान,

हा :- हार न मानणारे,

रा :- राज्याचे हितचिंतक,

ज :- जनतेचा राजा

———————-

शिव जयंतीच्या सर्व हिन्दू मावळ्यांना

खुप खुप शुभेच्छा

जय भवानी जय शिवाजी

———————-

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान

श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना

त्रिवार मानाचा मुजरा.

सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा.