HomeशहरअहमदनगरShivJayanti 2021 : आ. रोहित पवारांनी भर पावसात केलं भाषण; उपस्थितांना आली...

ShivJayanti 2021 : आ. रोहित पवारांनी भर पावसात केलं भाषण; उपस्थितांना आली शरद पवारांची आठवण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज शिव जयंतीच्या कार्यक्रमात भर पावसात भाषण करत उपस्थितांना संबोधित केलं. रोहित पवार यांचा अंदाज पाहून उपस्थितांना शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसात केलेल्या त्या ऐतिहासिक भाषणाची आठवण झाली.

रोहित पवार आज शिव जयंतीच्या कार्यक्रमासाठी जामखेडमध्ये आले होते. यावेळी अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या. परंतु रोहित पवार यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, आज शिवजयंतीनिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आज येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. काही तरुणांनी मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक दाखवलं. आज करण्यासारखं खूप होतं. परंतु अचानक पाऊस आला आणि कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला.

पुढं बोलताना ते म्हणाले, मी आयोजकांचा एवढंच सांगू इच्छितो, पाऊस आला असला तरी तुमचे प्रयत्न महत्त्वाचे होते. उद्देश महत्त्वाचा होता. दिवस चांगला होता. अशाच प्रकारे लोकांच्या सेवेसाठी तुम्ही काम करत रहा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी बोलताना केलं.

2019 च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात एका सभेला संबोधित केलं होतं. साताऱ्यातील पोटनिवडणुकीत भाजपच्या उदयनराजेंचा राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News