पुणे : सदाशिव पेठेतील औषध विक्रेत्यांकडून शिवजयंती साजरी
Share
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यात देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यातील प्रसिद्ध सदाशिव पेठेतील औषध विक्रते आणि औषध डिलिव्हरी बॉय यांच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
शिवजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय धोपावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन व गुप्तहेर खाते यावर शिवप्रेमींना माहिती दिली. तसेच डॉ. शैलेश गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माविषयी आणि राजवैद्यांविषयी माहिती दिली. यावेळी प्रसन्न पाटील यांची शिंदेशाही पगडी घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष पप्पु गजुर, उपाध्यक्ष रवि बनकर, केदार कडोलीकर, रामभाऊ गायकवाड, प्रसन्न पाटील, अपुर्व शहा, आनंद गिल्डा, सचिन कदम, योगेश काळे, तन्मय कुलकर्णी, राहुल साबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसन्न पाटील यांनी केले. आभार दिवाकर गोरे यांनी मानले.