खळबळजनक ! घाटकोपरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत शिवसैनिकाचा खून, संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – घाटकोपर येथे वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादावादीतून शिवसैनिकावर वार करुन त्यांचा खून करण्यात आला. बंटी उर्फ नितेश सावंत (वय २७) असे या तरुण शिवसैनिकाचे नाव आहे. त्याचे काका प्रदीप सावंत हे माजी नगरसेवक आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून पंतनगर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, नितेश सावंत याची चार पाच दिवसांपूर्वी काही जणांबरोबर भांडणे झाली होती. सावंत हे रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या काही मित्रांबरोबर वाढदिवसाची पार्टी करीत होते. त्यावेळी काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा विषय निघाला. त्यातून त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. चिडलेल्या ७ ते ८ जणांनी बंटी यांना मारहाण करुन त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यातच त्यांचा मृत्यु झाला.

ही घटना समजताच घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –