कट्टर शिवसैनिक मामिलवाड यांची युवासेनेच्या जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करावी’ : स्वप्नील केशवार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कट्टर शिवसैनिक व्यंकटेश मामिलवाड यांच्या कार्याची दखल घेऊन शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुखपदी वर्णी करावी अशी इच्छा स्वप्नील केशवार यांनी व्यक्त केली आहे

स्वप्नील केशवार म्हणतात, आज संपूर्ण महाराष्ट्रात ज्याच्या एक हाकेला रक्तदानाचा ,समाजकार्याचा जणू सागर तयार करणारा एक युवक..! लहानपणापासून त्याच्या आईनं समाजसेवेचं बाळकडू पाजलं आहे. मागील 5 वर्षांपासून त्याला जेव्हा कळायला लागलं तेंव्हा पासून वयाच्या 16 वर्षपासून रक्तदान, गोरगरिबांना मदत, कुठल्याही संकटाला भिडणं हे अंगिकारून वयाच्या 17 वर्षी पहिलं रक्तदान शिबिर जे कुठलीही पार्श्वभूमी नसताना करून दाखवणं म्हणजे एक जिगरबाज काम होत.

स्वप्नील केशवार पुढं म्हणतात, बघता बघता मित्रांच्या वाढदिवसानिमित्त निरर्थक खर्च न करता गोरगरिबांना शाल वाटप ,अन्न वाटप, दिवाळीच्या दिवशी म्हणून रस्त्यावर भटकंती करणाऱ्यांना प्रकाशरूपी टिकाऊ सौरऊर्जा दिवे वाटप,रक्षाबंधन हे अनाथ,अंध भगिणीसोबत साजरे करणे, निराधार असणाऱ्या वृद्धाश्रम मधील आजी आजोबांना आधार, संकटात सापडलेल्या गोरगरिबांच्या, मित्रांच्या मदतीचा आधार, गरीब, गरजूंना मध्यरात्री रक्त पुरवठा करणे, वाढदिवसानिमित्त अनेक जिल्हा परिषद शाळेमध्ये वह्या वाटप असे अनेक उपक्रम तो आपल्या जिगरबाज मित्रांच्या साथीने घेत हे सगळे तो आज वयाच्या 22 व्या करून दाखवत आणि ते केवळ एक युवक समाजसेवक, शिवसैनिक म्हणून.सध्या तो उच्च शासकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. मग विचार करा ह्या युवापिढीत समाजसेवेच्या बीज पेरणाऱ्या व्यंकटेश मामीलवाड युवकाला युवासेना शिवसेनाचा युवासेना जिल्हाप्रमुख केलं तर अनेक गोरगरिबांना, गरजूंना, न्याय मिळून देण्यास ताकत मिळेल.

स्वप्नील केशवार म्हणतात, हीच कारणं हेत की, अशा हिऱ्याची पारख होणे गरजेचे आहे. म्हणून व्यंकटेश मामीलवाड यास युवासेना जिल्हाप्रमुख पद मिळावं व असंख्य युवकांना शिवसैनिकांना ताकत मिळावी हिच सदिच्छा.