त्याच मुंडण करणाऱ्या ‘शिवसैनिकांना’ पोलिसांकडून ‘अटक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वडाळ्यात मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट लिहिणाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली आहे. मुंबईतील वडाळा भागात राहणाऱ्या हिरामणी तिवारी या व्यक्तीने फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर हिरामणी त्रिपाठीला गाठून शिवसैनिकांनी चोप दिला. एवढेच नाही तर त्याचे मुंडण देखील केले. त्यानंतर या मुंडण करणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई करण्यात आली.

मुख्यमंत्र्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तिवारी याला मारहाण करणाऱ्यांवर पोलिसांकडून आज कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 4 शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता शिवसेना पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दोन दिवसांपूर्वी तिवारी यांना चोप देण्यात आल्यानंतर तिवारीच्या समर्थनार्थ भाजप नेते किरीट सोमय्या उतरले होते. त्यामुळे भाजप विरूध्द शिवसेना असे वातावरण तापण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या वडाळ्यात दाखल झाले होते. त्यानंतर शिवसैनिक देखील वडाळ्यात जमले होते. तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा फौजफाटा लावला होता.

यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, हे गुंडांच सरकार आहे, जनतेला दिलासा देण्याचे आमचे काम आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसैनिकांमधून संताप व्यक्त होत होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/