मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी शिवसैनिक मोठया संख्येने अयोध्येस रवाना

पोलीसनामा ऑनलाइन  :  शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्या दौऱ्याचे नियोजन केले आहे. त्यांच्या स्वागतासाठी गुरुवारी विशेष रेल्वे ने शिव सैनिक अयोध्येस रवाना झाले.

अयोध्येच्या नियोजित दौऱ्याकरिता मुंबई आणि उपनगरांतील शिवसैनिकांसाठी १८ विशेष डब्यांची रेल्वे आयआरसीटीच्या माध्यमातून आरक्षित केली होती. लोकमान्य टिळक टर्मिनस ते अयोध्या आणि परतीचा प्रवास असे ते आरक्षण असेल. हि विशेष रेल्वे गुरुवारी दुपारी १.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मधून सुटणार होती मात्र ४५ मिनिटे उशिराने ती रवाना झाली. आज,रात्रीपर्यंत हि गाडी अयोध्येत पोहचेल. शनिवारी रात्री ११.३० वाजता या रेल्वे चा परतीचा प्रवास सुरु होईल.

शिवसेनेचे आमदार,नगरसेवक,पदाधिकारी,विमान आणि अन्य पर्यायी साधनांनी अयोध्येत आज दाखल होणार आहेत