शिवसेनेचा खुलासा ! नेटफ्लिक्स विरोधात तक्रार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील एन्गेज केलेल्या टीव्हीपासून स्वत:कडे ओढणाऱ्या नेटफ्लिक्सवर आता टीकेचे सुत्र सुरु झाले आहे. अमेरिकन ऑनलाईन स्ट्रीमिग कंपनी नेटफ्लिक्सविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. नेटफ्लिक्स विविध मालिकांमधून भारताचे चुकीचे चित्र उभ करत असल्याचा आरोपी रमेश सोलंकी यांनी केला आहे. रमेश सोलंकी हे शिवसेनेच्या आयटी सेलमध्ये कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. मात्र नेटफ्लिक्स विरोधात शिवसेनेने कोणतीही तक्रार केली नसल्याचा खुलासा शिवसेनेने केला आहे.

सोलंकी यांनी तक्रार केल्यानंतर नेटफ्लिक्सविरोधात शिवसेनेने तक्रार केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केले आहे की, शिवसेना पक्षाच्या वतीने नेटफ्लिक्सविरोधात तक्रार नोंदवल्याबद्दलची बातमी खोटी आहे. सर्व प्रसारमाध्यमांना विनंती आहे की जनतेची दिशाभूल करणाऱ्या चुकीच्या बातम्या छापण्यापूर्वी आमच्या अधिकृत पदाधिकाऱ्याकडून याची पुष्टी करावी, असे म्हटले आहे.

सिक्रेट गेम्स, लैला आणि राधिका आपटेच्या घुल या वेब सीरिजविरोधात तक्रार दाल करण्यात आली आहे. नेटफ्लिक्स इंडियावरील प्रत्येक मालिकेचा जागतिक स्तरावर भारताची बदनामी करण्याचा उद्देश असल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्याचप्रमाणे स्टँण्ड अप कॉमेडियन हसन मिव्हाज यांनी त्यांच्या शोमध्ये देशाविरोधी कृत्य कल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल नेटफ्लिक्सविरोधात कारवाई करण्याचे आवाहन सोलंकी यांनी केले आहे. तक्रारीची प्रत मुख्यमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवली आहे. दरम्यान, लिला या बेवसिरीजमध्ये कोणाचीही भावना दुखवल्या नसल्याचे लेखक पॅट्रिक ग्रॅहम यांनी स्पष्ट केले आहे.