उद्धव ठाकरेंविरोधात लिखाण केल्याचा कार्यकर्त्यांना आला राग, वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला

बीड : पोलीसनामा ऑनलाइन  –  बीड जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात ‘दैनिक लोकाशा’मध्ये लिखाण केले होते. या लिखाणावरून शिवनसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राग होता. त्यानुसार शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुशील पिंगळे यांच्यासह 10 जणांनी या वृत्तपत्राच्या कार्यालयावर दगडफेक करत हल्ला केला केला.

‘दैनिक लोकाशा’ या वृत्तपत्रात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात लिखाण करण्यात आले होते. याचाच राग शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आला होता. त्यावरून त्यांनी वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला चढवला. तसेच या कार्यकर्त्यांनी वृत्तपत्राच्या संपादकालाही जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांची गाडीही जाळण्याची धमकी दिली. याप्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, संबंधित आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिद पाडण्यासंदर्भात विधान केले होते. त्याचेच विश्लेषण या वृत्तपत्रात झाले होते. अधिवेशनात बाबर यासोबतच रामाच्या रॉयल्टीसाठी ठाकरेंचा रिक्षा कबरीत, असा उल्लेख होता. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यामध्ये वृत्तपत्राच्या कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.