राज्यातील राजकीय अस्थिरतेवर शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेनेकडून अनेक नेत्यांच्या भेटी घेण्याचे सत्र सुरु आहे. संजय राऊत हे कोणताही प्रस्ताव घेऊन आले नसल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलेला आहे आणि आम्ही जबाबदारीने विरोधात बसू असे देखील पवार यावेळी म्हणाले तसेच देशात सुरु असणाऱ्या अनेक गोष्टींवर देखील शरद पवारांनी यावेळी भाष्य केले.

दिल्लीत पोलिसांना ज्या प्रकारची वागणूक मिळाली त्याबाबत शरद पवारांनी खंत व्यक्त केली आहे. वर्दीतील व्यक्तीवर हल्ला होणे योग्य नाही. देशातील एकूणच पोलीस दलाची हालत खूप वाईट आहे. जास्त वेळ ड्युटी करूनही पोलिसांना सुट्टी मिळत नाही. यामध्ये केंद्र सरकारचे मोठे अपयश आहे, गृह मंत्रालय यासाठी जबाबदार असल्याचे परखड मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केले आहे.

विमा कंपन्यांबाबत काय म्हणाले पवार
राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांची हालत खूप वाईट आहे त्यामुळे विमा कंपन्या जर आपली जबाबदारी पार पाडत नसेल तर भारत सरकारने तातडीने आवश्यक बैठक बोलावून निर्णय घ्यावा. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा अंत पाहू नहे. कायदा हातात न घेता कंपन्यांना विश्वासात घेऊन मार्ग काढावा असे देखील शरद पवार यावेळी म्हणाले.

अयोध्येतील निकालावर केले भाष्य
लवकरच राम मंदिराबाबत निकाल लागणार असून त्या बाबत जो निर्णय होईल तो सर्वांनी मान्य करावा कोणीही कायदा हातात घेऊ नहे असे शरद पवारांनी यावेळी आवाहन केले. बाबरी मस्जिद हल्ल्यावेळी जी परिस्थिती निर्माण झाली होती ती पुन्हा होऊ नहे असेही पवार यावेळी म्हणाले.

Visit : Policenama.com