‘या” बाबीमुळे शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये मतभेद !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   महाराष्ट्र राज्यात सत्तेत वाट्यात एकत्र असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खेड तालुक्यात मात्र, प्रचंड मतभेद आहेत. पंचायत समितीच्या नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारतीवरुन दोन्ही पक्षात राजकीय वैर निर्माण झाले आहे.

शिवसेनेचे पदाधिकारी आणि पंचायत समिती सदस्य यांनी शुक्रवारी दुपारी एकत्र येऊन नूतन इमारतीच्या जागेवर असणाऱ्या 19 झाडे तोडून घोषणाबाजी केली. खेड विभागाच्या उपअभियंत्यास घेराव घातला आणि मंजूर इमारतीचे काम नियोजित जागेत सुरू करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी केलेली घोषणाबाजी म्हणजे राष्ट्रवादीला शहच होता, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

वाडा रस्त्याच्या पलिकडे जुन्या बांधकाम विभागाच्या कार्यलयाच्या जागेत खेड पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे काम सुरू आहे. यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 14 फेब्रुवारी 2019 रोजी माजी खासदार शिवाजी आढळराव आणि माजी आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले होते.

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत दिलीप मोहिते हे आमदार झाले आणि मोहिते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा परिसर दाखवून हे काम थांबविले. सध्याच्या इमारतीत नवीन आराखडा करण्यास मंजुरी देण्याची मागणी केल्यामुळे हे काम रखडले आहे.

खेड पंचायत समितीच्या नूतन इमारत जागेवरुन मागील सहा महिन्यांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड पंचायत समिती परिसरात पाहाणी करुन नियोजित जागेवर पंचायत समितीचे काम न करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पंचायत समितीतील नियोजित जागेवरील परवानगी घेऊन 19 झाडे तोडली. लवकरच त्या जागेवर पंचायत समितीची इमारत उभी राहणार आहे, असे शिवसेना तालुकाध्यक्ष रामदास धनवटे यांनी घोषणा केली आहे.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवाजी वरपे, तालुकाध्यक्ष रामदास धनवटे, महिला आघाडी अध्यक्ष विजया शिंदे, उर्मिला सांडभोर,पंचायत समिती उपसभापती ज्योती अरगडे, सदस्य भगवान पोखरकर, वैशाली जाधव आदी उपस्थितीत होते.

खेड पंचायत समितीवर शिवसेना पक्षाची सत्ता आहे. माजी आमदार आणि माजी खासदार यांच्या प्रयत्नातून खेड पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्धाटन विधानसभा निवडणुकीपूर्वी केले होते. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरी पंचायत समितीच्या कामाला सुरुवात नाही झाली . शुक्रवारी अचानक शिवसेना पदाधिकारी आणि पंचायत समिती सदस्यांचा मोर्चा पंचायत समितीवर आला. नूतन इमारतीच्या जागेवर असणाऱ्या 19 झाडांची तोडणी करण्याची परवानगी घेऊन झाले तोडली.

पंचायत समितीच्या नूतन इमारतीवरून सुरु झालेल्या वादात शिवसेना पक्षाने पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे. तर, विरोध करणारी राष्ट्रवादी काँग्रेस पुढील काळात काय भूमिका घेणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like