‘महाविकास’आघाडीमध्ये शरद पवारांच्या हस्तक्षेपामुळे शिवसैनिकांमध्ये ‘नाराजी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणवर वाढत असल्याने अनेक शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळ विस्तार केल्यापासून अनेक आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अनेकांनी ही नाराजी व्यक्त देखील करून दाखवली आहे. तसेच नाराज आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याची वेळ देखील माघितली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शरद पवारांनी हस्तक्षेप केल्याने अनेक शिवसैनिक नाराज आहेत. पवारांनी आपली राजकीय ताकद वापरून महत्वाची खाती आपल्या पक्षाकडे घेतली असल्याने अनेक शिवसैनिक त्यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. प्रताप सरनाईक, भावना गवळी, भास्कर जाधव असे अनेक नेते समोर येऊन यावर थेट भाष्य करत आहेत.

पवारांना खुश करण्याच्या कारणावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह
कमी आमदार निवडून येऊनही सत्तेत असलेल्या काँग्रेसला एका आमदाराची नाराजी देखील परवडणार नाही त्यामुळे ते नाराज आमदारांवर कारवाई देखील करू शकत नाही. पुण्यामध्ये पार्टी कार्यालयात झालेल्या वादामुळे दिल्लीतील नेतृत्व चिंता व्यक्त करत आहे. संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात गोंधळ घातला होता. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी चर्चा करण्यास काँग्रेसने पसंती दर्शवली आहे. अजित पवार हे आता पुण्याकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष देणार असल्यामुळे काँग्रेसला पुण्यामध्ये मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. अशात थोपटे यांना मंत्रिपद दिल्याने स्थानिक राजकारणात काँग्रेसचा दबदबा वाढू शकतो. बाळासाहेब थोरात यांच्यावर थोपटे यांची समजूत काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/