करमाळा मतदार संघात शिवसेनेकडून रश्मी बागल यांना उमेदवारी !

करमाळा (सोलापूर), पोलीसनामा ऑनलाइन – रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर करमाळा विधानसभा मतदार संघाचा वाढलेला तिढा आज अखेर सुटला. कारण शिवसेनेने आज रश्मी बागल यांना अधिकृत AB फॉर्म दिला आहे. राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतू त्यामुळे विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या अडचणी वाढल्या. पक्ष कोणाला तिकीट देणार यावर तिढा निर्माण झाला होता. परंतू शिवसेनेने आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली.

विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी सोलापूरातील मेळाव्यात बोलताना सांगितले होते की रश्मी बागल यांना उमेदवारी दिल्यास मी गप्प बसणार नाही आणि मला उमेदवारी मिळाली तर रश्मी बागल गप्प बसणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. परंतू आज अखेर रश्मी बागल यांना पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर नारायण पाटील काय भूमिका घेणार हे लवकर स्पष्ट होईल.

रश्मी बागल यांनी पक्षांतरावेळी सांगितले की आमच्या लोकांमध्ये थोडी असुरक्षितता होती. पक्ष बदलला पाहिजे अशी जनतेची मागणी होती. हे लक्षात घेऊन मी शिवसेनेत प्रवेश केला.

विद्यमान आमदार नारायण पाटील यांना पक्षाने डावलल्यामुळे पाटील आणि समर्थकांमधील नाराजी अजून तरी समोर आली नाही, परंतू सोलापूर मेळाव्यातील त्यांच्या विधानानंतर आता ते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Visit : Policenama.com