शिवसेना भाजप युती मुद्दा STOP..!!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना आणि भाजप युतीच्या प्रस्तवाला आता ब्रेक लागल्याचं स्पष्ट झालं असून मागच्या आठ दिवसांपासून युतीच्या कुठल्याही चर्चा या दोन्ही पक्षात झाल्या नाही भाजप  च्या काही मोठ्या नेत्यांचा युती साठी आग्रह असला तरी शिवसेना याला हवा तसा प्रतिसाद देत नसल्याचं दिसून येतं, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे युती बद्दल चर्चेची जबाबदारी सोपवली होती अनेक वेळा युती चर्चेसाठी फोन केले गेले निरोप पाठवले पण म्हणावा तसा  प्रतिसाद शिवसेने कडून आला नसल्या कारणाने, युती व्हावी अशी शिवसेनेची इचछा नाही.  असेच आता म्हणावे लागेल. शिवसेनेच्या नेत्यांच्या एकंदर देहबोली वरून असं वाटतंय की शिवसेनेला भाजप ची अजिबात गरज नाही, भाजप लाच शिवसेने कडे यावे लागेल .असे संकेत येऊ लागलेत या सगळ्यामुळे चंद्रकांत दादा पाटील हताश झाले आहेत कारण ते एकमेव या युती साठीचा दुवा आहे.

युती वर रावसाहेब दानवे यांचं मत
शिवसेनेच्या अयोध्या मुद्द्याला भाजपचा पाठींबा आहे असे सूचक वक्तव्य करून शिवसेनेच्या नेत्यांना युतीसाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न हि दानवे यांनी केला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी दिल्लीत बैठक घेऊन लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातील कामाची विभागणी करून दिली आहे. या विभागून दिलेल्या कामाच्या निमित्तांने रावसाहेब दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जाऊन पक्षाची बांधणी करण्याला नव्याने सुरुवात केली आहे. याच कामाचा भाग म्हणून त्यांनी धुळ्याचा दौरा केला आहे. रावसाहेब दानवे धुळ्याला आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित केले. अनिल गोटे यांनी बंडाळी केली त्यामुळे धुळ्यात पक्ष शिस्त बिघडली आहे. तुमचा पक्ष अनिल गोटे यांच्यावर कार्यवाही करणार का? अशा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता आमचा पक्ष कसल्या हि पध्द्तीची कार्यवाही करणार नाही असे रावसाहेब दानवे यांनी म्हणले आहे..

युतीवर मुख्यमंत्र्यांचं मत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा सर्व 48 लोकसभा मतदारसंघात उमेदवार देईल. मित्रपक्षांच्या जागेवरही भाजपाचेच उमेदवार असतील. त्यामुळे 48 पैकी 40 जागांवर भाजपा विजयी झाली पाहिजे.  अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. लातूरमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्षाच्या संकल्प मेळाव्यात फडणवीस बोलत होते. युतीच्या संभ्रमात राहू नका, तुम्ही तयारीला लागा.

भाजप राष्ट्राध्यक्ष अमित शाह यांचं मत
युती होईल का नाही याची चिंता तुम्ही करू नका. युतीची बोलणी आम्ही करू परंतु युती झाली नाही तर आपल्या मित्र पक्षांना पण आपण पाडू.

तिसरी पानिपतची लढाई जशी महत्वाची होती तशीच २०१९ ची लढाई आहे. पानिपतची लढाई आपण हरलो पण आपणाला २०१९ ची लढाई जिंकायची आहे असे अमित शहा म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांनी आपल्या घराण्याचा इतिहास बघून इतरांवर भष्टाचाराचे आरोप करावे. राफेल प्रकरणी चौकशीची आवश्यकता नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हणले आहे.

भाजपने राज्यात आणि केंद्रात लोकांच्या एका पैशाचा हि भष्टाचार केला नाही. गरीब कुटुंबातून आलेल्या नेत्याला काँग्रेस बदनाम करण्याचे षडयंत्र करत आहे.

जलयुक्त शिवार योजना हि देवेंद्र फडणवीस सरकारचे मोठे यश आहे.

विरोधकांना हृदय विकाराचे झटके आले पाहिजे असे निकाल २०१९ च्या निवडणुकीचे लागले पाहिजे.