Shiv Sena | शिवसेना खासगी मालमत्ता म्हणून कोणीही अधिकार सांगू शकत नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना शिवसेना (Shiv Sena) पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे (Shiv Sena) मनापासून अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

 

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचं (Shiv Sena) नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं, ही आनंदाची गोष्ट आहे. एकनाथ शिंदे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो, खरी शिवसेना हीच आहे. कारण शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे. त्यामुळे तो विचार पुढे नेहण्याचे काम शिंदे करीत आहेत. त्यामुळे कुणीही शिवसेनेवर खासगी मालमत्ता म्हणून अधिकार सांगू शकत नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

बाळासाहेबांचा विचार आणि शिवसैनक ज्यांच्याकडे तीच खरी शिवसेना ठरणार आहे, हे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो.
आज निवडणूक आयोगानं (Election Commission) दिलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं.
आम्हाला याचा विश्वास होता. याचं कारण यापूर्वीच्या सर्व निर्णयामध्ये निवडणूक आयोगानं पक्षातील फुटीवर असेच निर्णय दिले आहेत.
आमदार आणि खासदार यांची संख्या लक्षात घेऊनच निर्णय झाला आहे.
कारण एखादा पक्ष मतदारांच्या आधारावर असते, तो आमदार खासदारांवर असतो, असे फडणवीस म्हणाले.

 

 

Web Title :- Shiv Sena | bjp devendra fadnavis on shiv sena shiv sena party name symbol bow and arrow will be retained by eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravindra Jadeja | जडेजाने कसोटीत रचला विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला तर जगातील दुसरा खेळाडू

Pravin Darekar | शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘पवारांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व…’

Governor Bhagat Singh Koshyari | राष्ट्रवादीने प्रसिद्ध केले राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे ‘अधोगती पुस्तक’, दिला ‘हा’ शेरा