दीपिकाच्या ‘समर्थनार्थ’ पुढे आली शिवसेना, संजय राऊत म्हणाले – ‘तालिबानी पध्दतीनं नाही चालणार देश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दीपिकाने जेएनयूमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना समर्थन दिल्यानंतर सोशल मीडियावर अतिशय वाईट पद्धतीने तिचा विरोध केला जात आहे. एकीकडे तिला विरोध करून हॅशटॅग ट्रेंड सुरू असताना, दुसरीकडे तिच्या बाजूनेही अनेक लोक उभे राहिले होते. आता या यादीत शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नावाचा समावेश झाला आहे. आज सकाळी संजय राऊत यांनी अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या समर्थनासाठी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, या देशाला तालिबानी पद्धतीने चालवता येणार नाही. मंगळवारी जेएनयूमध्ये दीपिका गेल्यानंतर अनेक लोकांनी तिचे कौतूक केले, परंतु, काही लोकांनी डाव्यांचे समर्थन केल्याने तिच्यावर टीकेचे आसूड ओढले. तसेच हा छपाक चिपत्रपटाच्या प्रमोशनचा स्टंट होता, असेही म्हटले. यामुळे काही लोकांनी तिच्या छपाक या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. काही भाजपा नेत्यांनीही दीपिकावर टीका केली.

याबाबत राऊत म्हणाले, अभिनेत्री आणि चित्रपटावरील बहिष्काराची मागणी चूकीची आहे. देशाला तालिबानी पद्धतीने चालवता येणार नाही. मेघना गुलजार दिग्दर्शित छपाक आणि अजय देवगणचा चित्रपट तानाजी यांची बॉक्स ऑफिसवर स्पर्धा झाली. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारने गुरूवारी दोन्ही राज्यात चित्रपट टॅक्स- फ्री घोषित केला.

यापूर्वी वादात सापडलेल्या छपाकच्या निर्मात्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने रोखले होते. अ‍ॅसिड अटॅक सर्वायव्हर लक्ष्मीच्या जीवनावर तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात तिची वकील अपर्णा भट यांना क्रेडीट न देताच तो रिलिज केला. न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांनी निर्देश दिले की निर्मात्यांनी 15 जानेवारीपर्यंत अ‍ॅसिड सर्वायव्हरच्या वकीलांच्या रूपात अ‍ॅड. अपर्णा भट यांच्या योगदानाचे श्रेय त्यांना द्यावे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/