जिल्हा प्रमुख कैलास पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – गेले कित्येक दिवस चालू असलेल्या सेनेच्या उमेदवारीचा संभ्रम दूर झाला असून अखेर जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांना उस्मानाबाद कळंब मतदार संघातून सेनेची उमेदवारी मिळाली आहे सेनेच्या वरिष्ठांनी संबंधित सर्व नेत्यांची समजूत काढल्याचे समजते.

कोण आहेत कैलास पाटील
तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यानंतर ऐनवेळी सेनेत प्रवेश करून त्यांनी राष्ट्रवादीच्या आदित्य गोरे यांचा पराभव केला होता सेनेत चालू असलेल्या जुना व नवीन वाद मिटवून कैलास पाटील कसे मार्गक्रमण करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

याच पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची व नेत्यांची घालमेल वाढली आहे काहींनी तर बंडाचे निशाण रोवले आहे प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे यांनी यासंदर्भात आज मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांची चर्चा केली त्यावेळी बऱ्याच जणांनी त्यांना बंड करून अपक्ष निवडणूक लाढवण्याचा आग्रह केला परंतु या बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याचे समजते
एकूण राजकीय हालचालीने जिल्हा ढवळून निघाला आहे नेते जोमात व कार्यकर्ते कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे खास करून उस्मानाबाद व तुळजापूर मतदारसंघात युतीचा धर्म पाळला जातो किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे निष्ठावान कार्यकर्त्यांना कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडला आहे.

Visit : Policenama.com