बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेऊ शकत नाहीत त्यांच्याबद्दल काय बोलणार ? भाजपचा सेनेला ‘टोला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यात सत्तास्थापनेच्या नाट्याला आज नविन वळण लागले. आज सकाळी अजित पवार यांच्या समर्थकाच्या एका गटाने भाजपला साथ देत सत्ता स्थापनेचा दावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शपथ दिली. सत्तेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर बंद करावा. शिवसेनेने ती भाषा बोलू नये. बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेऊ शकत नाही त्यांच्याबद्दल काय बोलणार ? अशा शब्दात भाजपचे नेते रवीशंकर प्रसाद यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

पंतप्रधान, गृहमंत्री यांच्या विरोधात ज्या शब्दांचा शिवसेनेने वापर केला त्याबद्दल आम्हाला खंत वाटते. स्वार्थासाठी शिवसेनेने युती तोडली. बाळासाहेबांचा काँग्रेसविरोध प्रामाणिक अन् सर्वश्रृत होता, मात्र शिवसेनला त्याचा विसर पडला. विधानसभेचा निकाल हा भाजपचा नैतिक आणि राजकीय विजय होता. विरोधात बसायचं होत मग खुर्चीसाठी मॅच फिक्सिंग कोणी केली. शिवसेना कोणाच्या इशाऱ्यावर वागत होती ? महाविकासआघाडीने एकदा तरी सत्तेचा दावा राज्यपालांकडे केला का ? त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ होते तर मग त्यांनी सत्तास्थापनेचा दावा करायला पाहिजे होता असे ही रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, भाजप विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या विधिमंडळ नेत्यांनी राज्यपालांकडे आमदारांच्या सहीचे पत्र दिले. तांत्रिकदृष्ट्या हे सगळं कायदेशीर झालं आहे. विधिमंडळात आम्ही बहुमत सिद्ध करू असा विश्वास रवीशंकर प्रसाद यांनी व्यक्त केला.

Visit : Policenama.com